रिक्षा चालक मालकांचे विविध मागण्यासाठी धडक मोर्चा आंदोलन

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


रिक्षा चालक मालकांचे विविध मागण्यासाठी धडक मोर्चा आंदोलन


 


मुक्त रिक्षा परवाना बंद करावा ,रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे , रिक्षा चालकांचे कर्ज माफ करावे ,रिक्षा चालकांसाठी घरकुर योजना राबवावी , महिला रिक्षाचालकांना दोन लाख रुपये सबसिडी  देण्यात यावे , ओला उबेर सह बेकायदेशीर वाहतुक बंद करावी  या सह इतर विविध मागण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतवतीने ,  पंचायत अध्यक्ष  कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे धडक मोर्चा काढून आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले,


चालू अधिवेशनात मुक्त रिक्षा परमिट बाबत माहिती घेऊन मुक्त रिक्षा परवाना परमिट बंद करणार , रिक्षा चालक मालकांसाठी लवकरच कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार असे या बरोबरच इतरही प्रश्न सोडविण्याचे आश्वासन परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिले , तसेच खासदार सुप्रियाताई सुळे आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन महाआघाडी सरकारच्या वतीने प्रश्न करण्याचे आश्वासन दिले,


 यावेळी पंचायतचे महाराष्ट्र वरिष्ठ उपाध्यक्ष आनंद तांबे , पुणे शहर अध्यक्ष सदाशिव पवार ,  अर्जुन देशमुख , रोहित गायकवाड , तुकाराम नागरगोजे , बाबूभाई शेख , बाळा जगदाळे , प्रसिद्धीप्रमुख संतोष आमले , पनवेल तालुका अध्यक्ष शैलेश पवार,  ठाणे जिल्हा अध्यक्ष शिवाजी गोरे , अंबरनाथ अध्यक्ष आशिष देशपांडे, बीड जिल्हाध्यक्ष सुग्रीव शिंदे,लोणावळा शहराध्यक्ष आनंद सदावर्ते, लक्ष्मण शेलार,तुषार लोंढे,संदीप बोराटे ,  आनंद नायडू अजित बराटे, बाळासाहेब सोनवणे ,बाबासाहेब डवरी , सुरेश आठवले ,राजू पठाण , पापु गावरे , कष्टकरी कामगार पंचायतचे कार्याध्यक्ष बळीराम काकडे , कोषाध्यक्ष प्रल्हाद कांबळे , लालचंद पवार, घरकाम महिला सभा अध्यक्ष आशा कांबळे शोभा शिंदे, कौसल्या नेटके ,महिला रिक्षा चालक,सरस्वती गुजलोर,जयश्री मोरे लक्ष्मी हरपद, रेखा भालेराव व मुंबई, पनवेल, कल्याण डोंबवली , ठाणे , पुणे पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा चालक मोठ्या संख्येने  तसेच महिला रिक्षाचालक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या,


यावेळी बाबा कांबळे म्हणाले महाराष्ट्र सरकारने मुक्त रिक्षा परवाना , सुरु केला असुन मागेल त्यास परमिट असे सरकारचे धोरण आहे या मुळे लोकसंख्ये पेक्षा अधिक रिक्षा रस्त्यावर आल्या असुन रिक्षा चालकान मध्ये जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. यामुळे रिक्षा व्यवसायकांवर उपासमारीची वेळ आली असून रिक्षाचालकांना बँकेचे हप्ते भरणे देखील मुश्किल झाले आहेत,  आर्थिक संकटांना कंटाळून महाराष्ट्रात पंधरापेक्षा अधिक रिक्षाचालकांनी आत्महत्या केल्या आहेत, आर्थिक संकटात सापडले रिक्षाचालकांचे कर्ज माफ करावे बेकायदेशीर वाहतूक बंद करावे निवेदन देऊन देखील दखल न घेतल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले ,आंध्र प्रदेश सरकारने  महिला रिक्षाचालकांना दोन लाख रुपये  अनुदान जाहीर केले असून या धरतीवरती महाराष्ट्र सरकारने देखील महिला रिक्षाचालकांना दोन लाख रुपये सबसिडी द्यावी तसेच महिलांना  पण ची परमिट  फी आणि इतर फी  माफ केली पाहिजे , महिला रिक्षाचालकांसाठी विविध योजना राबवाव्यात 


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*