आयसीएआय'च्या पश्चिम विभागीय मंडळाच्या (महाराष्ट्र, गुजरात, गोवा) खजिनदारपदी* *पुणे शाखेचे माजी अध्यक्ष सीए आनंद जाखोटिया यांची निवड*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


#PRESSNOTE


*'आयसीएआय'च्या पश्चिम विभागीय मंडळाच्या (महाराष्ट्र, गुजरात, गोवा) खजिनदारपदी*
*पुणे शाखेचे माजी अध्यक्ष सीए आनंद जाखोटिया यांची निवड*


पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पश्चिम विभागीय मंडळाच्या (वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल - डब्ल्यूआयआरसी) खजिनदारपदी 'आयसीएआय'च्या पुणे शाखेचे माजी अध्यक्ष सीए आनंद जाखोटिया यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याचा समावेश असलेल्या या विभागीय मंडळावर पुण्यातील आनंद जाखोटिया खजिनदार म्हणून काम पाहणार आहेत. मावळते खजिनदार सीए यशवंत कासार यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. 'डब्ल्यूआयआरसी'च्या अध्यक्षपदी सीए ललित बजाज, उपाध्यक्षपदी सीए विशाल दोषी, सचिवपदी सीए मुर्तझा काचवाला यांची निवड झाली आहे.


डब्ल्यूआयआरसी'च्या मंडळाची ही कार्यकारिणी २०२०-२१ या वर्षांसाठी असणार आहे. या विभागात १,१६,००० सीए सदस्य, तर २,५०,००० सीएचे विद्यार्थी आहेत. सीए आनंद जाखोटिया पुणे शाखेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वीच त्यांची 'डब्ल्यूआयआरसी'च्या सदस्यपदी (२०१९) निवड झाली होती. व्यवस्थापनातील सक्रिय सहभागाच्या जोरावर वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथून आलेल्या आनंद जाखोटियांनी संस्थेच्या विविध पदांवर अनेक जबाबदाऱ्या सक्षमपणे पेलल्या आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली 'आयसीएआय'च्या पुणे शाखेने (२०१८-१९) राष्ट्रीय व विभागीय स्तरावर उत्कृष्ट सीए शाखा व विद्यार्थी शाखा असे चार पुरस्कार मिळवले होते.


'डब्ल्यूआयआरसी'च्या खजिनदारपदी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करून सीए आनंद जाखोटिया म्हणाले, "सीए इन्स्टिट्यूटमध्ये सीए, विद्यार्थी आणि समाजासाठी अनेक उपक्रम राबविणार आहोत. त्यामध्ये तज्ज्ञांशी संवाद, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, सीएसआर उपक्रम, समुपदेशन कार्यक्रम, औद्योगिक, शासकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांशी समन्वय, चांगल्या पायाभूत सुविधा उभारून देण्याचा आणि त्याचा योग्य उपयोग करण्याचा आमचा प्रयत्न राहील."


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*