नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात खासदार मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते प्रा. डॉ. संजय चोरडिया यांचा सन्मान

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


'सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी'चा


'एज्युकेशन एक्सलन्स'ने खासदार मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते गौरव


-----------------------------------------------------------------------------------------------------


'सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी'चा


'सर्वोत्तम व्यवस्थापन शैक्षणिक संस्था पुरस्कार २०२०’ प्रदान


नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात खासदार मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते प्रा. डॉ. संजय चोरडिया यांचा सन्मान


 


पुणे : इंटिग्रेटेड चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित 'नॅशनल एज्युकेशन एक्सलन्स कॉनक्लेव्ह'मध्ये सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड टेक्नलॉलॉजीला (एसआयबीएमटी) 'सर्वोत्तम व्यवस्थापन शैक्षणिक संस्था पुरस्कार २०२०’ प्रदान करण्यात आला. ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी दिल्ली भाजपच्या प्रवक्त्या खासदार मीनाक्षी लेखी व ‘एआयसीटीई’चे सल्लागार (ऍडवायजर) आर. हरिहरन यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.


 


नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे झालेल्या या परिषदेला विविध विद्यापीठे, उद्योग संस्था आणि केंद्र सरकारच्या अनेक मान्यवर प्रतिनिधींची उपस्थिती होती. प्रसंगी ‘एआयसीटीई’चे सल्लागार आर हरिहरन, 'सीबीएसई'चे संचालक बिस्वजीत साहा, अनुपम चोक्सी, शोभित विद्यापीठाचे कुलगुरू कुमार शेखर विजेंद्र, ‘सीईजीआर’चे अध्यक्ष रवीश रोशन, 'एसआयबीएमटी'चे सहायक प्राध्यापक आर. आर. संचेती आदी उपस्थित होते.


 


प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, "विद्यार्थी-शिक्षकांच्या गरजेनुसार प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाते. तसेच विविध कार्यशाळा, कार्यक्रमांना आमच्या येथील शिक्षक जात असतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित आणि ‘एआयसीटीई’ प्रमाणित 'एसआयबीएमटी'मध्ये 'एमबीए' पदवी शिक्षणासह विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे. तज्ञ्ज शिक्षक, तसेच गुणवतेबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान असलेले अभ्यासक्रम विद्यार्थ्याना शिकवले. त्याचबरोबर त्यांच्याकडून अभ्यासक्रमावर आधारित सरावही करून घेतला. भारतीय मूल्यांना पाश्चात्य दृष्टिकोनासोबत गुंफून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी मिळवून देणे आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण संस्था म्हणून नावारूपास येणे या उद्दीष्टाने संस्था काम करत आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे ही पुरस्काररूपी पोचपावती आहे. या यशात संस्थेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे आहे."


-----------------------------------


फोटो ओळ : 


खासदार मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते 'सर्वोत्तम व्यवस्थापन शैक्षणिक संस्था पुरस्कार २०२०’ स्वीकारताना प्रा. डॉ. संजय चोरडिया. प्रसंगी ‘सीईजीआर’चे अध्यक्ष रवीश रोशन, मीनाक्षी लेखी, डॉ. संजय चोरडिया, ‘एआयसीटीई’चे आर. हरिहरन यांच्यासह इतर मान्यवर.


 


 


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ *बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*