कर्जत नगरपरिषदेवर विषय समित्यांवर महायुतीचे वर्चस्व

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
कर्जत नगरपरिषदेवर विषय समित्यांवर महायुतीचे वर्चस्व

कर्जत,ता.27बातमीदार

                 कर्जत नगरपरिषदेच्या विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली असून सत्ताधारी शिवसेना-भाजप यांच्या महायुतीने सर्व विषय समित्यांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महायुतीची सत्ता असताना कर्जत नगरपालिकेत मात्र विषय समित्यांच्या निवडणुकीत नव्या समीकरणे यांची नांदी झालेले नाहीत असे दिसून येत आहे.

                  कर्जत नगरपरिषदेच्या विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली असून स्थायी समितीच्या अध्यक्ष तथा नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी विषय समित्यांचे सर्व सभापती आणि निवड झालेले सदस्य यांचे अभिनंदन केले आहे.

 

विषय समित्या-

1-स्वच्छता,वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापती - पदसिद्ध उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल,सदस्य वैशाली मोरे,नितीन सावंत,शरद लाड,उमेश गायकवाड

2-पाणीपुरवठा आणि जल निसारण समिती

सभापती-बळवंत घुमरे,सदस्य-

संचिता पाटील, स्वामींनी मांजरे,सुवर्णा निलधे,सोमनाथ ठोंबरे

3-सार्वजनिक बांधकाम आणि शहर नियोजन समिती

सभापती-विवेक दांडेकर,सदस्य-विशाखा जिनगरे, राहुल डाळिंबकर,भारती पालकर,मधुरा चंदन

4-महिला आणि बालकल्याण समिती 

सभापती-प्राची डेरवणकर, उपसभापती-संचिता पाटील

सदस्य-वैशाली मोरे,पुष्पा दगडे,ज्योती मेंगाळ

5-स्थायी समिती

सभापती-नगराध्यक्ष सुवर्णा जोशी,सदस्य अशोक ओसवाल,बळवंत घुमरे, विवेक दांडेकर, प्राची डेरवणकर.◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*