Press release
*रोड सेफ्टी वॉकेथॉन ला चांगला प्रतिसाद*
पुणे :
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्यकेशन सोसायटीच्या एम.ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट च्या वतीने लष्कर भागात ' रोड सेफ्टी वॉकेथॉन ' चे आयोजन करण्यात आले होते. लष्कर पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित या उपक्रमात आझम कॅम्पस,महात्मा गांधी रस्ता परिसरात वाहतूक सुरक्षा विषयक जनजागृती करण्यात आली. मोटार व्हेईकल अॅक्ट २०१९ ची माहिती देणारी पत्रके वाटण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, प्राध्यापक मोठया संख्येने सहभागी झाले.३१ व्या रस्ते सुरक्षा सप्ताह निमित्त १७ जानेवारी रोजी आयोजित या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला.
................................................