दि.११-०१-२०२०
*प्रेस नोट*
‘ *जलरक्षणाची ट्वेंटी-ट्वेंटी...बॅक टू स्कूल '*
ट्वेंटी-ट्वेंटी मॅच बघायला प्रत्येकाला आवडते. मग ट्वेंटी-ट्वेंटी या वर्षात जलरक्षण करण्याची मॅच लोकसहभागातून खेळूया ! ट्वेंटी-ट्वेंटी च्या ट्वेंटी ला अर्थात *वर्ष २०२० च्या दर महिन्याच्या 20 तारखेला पाणी बचतीच्या एक नवीन थीमवर आधारित अभियान करण्यात येणार आहे.*
*जलरक्षण करण्याचा हा अभिनव संकल्प जलरक्षक प्रबोधिनीचे संस्थापक मकरंद टिल्लू यांच्या प्रेरणेतून करण्यात येणार आहे.* मकरंद टिल्लू हे एकपात्री कलाकार व मोटिव्हेशनल स्पिकर आहेत. तसेच ' सेव्ह वॉटर हिरो अवॉर्ड ' चे मानकरी आहेत.
*पाण्याची गळती ही सर्वात मोठी समस्या आहे.गळतीमुळे 40 ते 50 टक्के पाणी वाया जाते.* म्हणूनच गेली 7 वर्षे संस्थेतर्फे पाण्याची गळती थांबविण्यासाठी कार्य करण्यात येत आहे. *लोकं अनाथांसाठी कार्य करतात, जलरक्षक गळक्या अनाथ नळांसाठी कार्य करतात.* पाणी वाचण्यासाठी, पाणी वाचवणारी मने तयार करणे महत्वाचे आहे असे टिल्लू मानतात. कृती केली तरच वृत्ती बदलते ,म्हणूनच कृतीवर आधारित उपक्रम राबविण्यात येतात. आजवर 40000 हुन अधिक लोकसहभागातून 30000 हून अधिक गळके नळ बदलून 100 कोटी लिटर पेक्षा अधिक पाणी बचत करण्यात आली आहे.
*अभियान स्वरूप :-* वर्ष 2020 च्या 20 तारखेला ला अर्थात दर महिन्याच्या 20 तारखेला पाणी बचतीच्या एक नवीन थीमवर आधारित कार्य करण्यात येणार आहे.
*20 जानेवारी पासून सुरू होणाऱ्या या अभियानात या महिन्याची थीम आहे ' जलरक्षण ...बॅक टू स्कूल ' !*
शाळेमध्ये मुलांच्या खेळकरपणामुळे गळके नळ, तुटके नळ असतात. गळतीने करंगळीच्या निम्मे सतत पाणी वाहून जाणारा नळ, वर्षभरात सुमारे पाच लाख लिटर पाणी वाया घालवतो. हे सर्वांसाठी असलेल्या धरणाचे 'पंक्चर' आहे. *म्हणूनच 20 जानेवारी पासून महिन्याभरात 100 शाळांमध्ये मुलांच्या सहकार्याने सर्व्हे करून गळके नळ बदलण्याचे कार्य करण्यात येणार आहे. याद्वारे 'गळतीमुक्त शाळा' करण्यात येणार आहे* . या उपक्रमात 175 हास्य क्लब असलेली संस्था ' *नवचैतन्य हास्ययोग परिवार* ' व पर्यावरण क्षेत्रातील मान्यवर संस्था ' *वनराई* ' तसेच अनेक सामाजिक संस्थांच्या सहकार्याने काम करण्यात येणार आहे. या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे आर्थिक रक्कम न स्वीकारता, लोकसहभागासाठी नळदान स्वीकारले जाते. म्हणूनच यंदा संक्रातीनिमित्तचे वाण म्हणून ,नळदान करून या अभियानास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
तसेच प्रत्येक पुणेकरांना आवाहन करण्यात येत आहे की आपणही आपल्या शाळेत जाऊन ' गळके नळ' शोधण्याच्या कार्यात सहभागी व्हावे. *माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने* हे नळ बदलून आपली शाळा ' गळतीमुक्त' करावी. या कार्यात सहकार्य लागल्यास मकरंद टिल्लू (मो.9766334277) यांना संपर्क साधावा.
आपला
मकरंद टिल्लू
जलरक्षक प्रबोधिनी