आज कुस्तीचा अंतिम सामना झाला
नाशिकचा पै.हर्षवर्धन सदगीर
महाराष्ट्रकेसरी झाला त्याच्या
विरोधात लढलेल्या पै.शैलेश शेळके चा
त्याने पराभव केला
पण ह्या कुस्तीमध्ये आज
एक महत्वाची गोष्ट
आजच्या तरुण पिढीसाठी शिकवून गेली .
दोघेही पैलवान
अर्जुनवीर काकासाहेब पवार
यांच्येच शिष्य दोघेही एकाच
तालमीत वाढलेले अत्यंत घट्ट मैत्री असलेले.
नशिबाने दोघेही अंतिम फेरीत
दाखल झाले दोघांना एकमेकांच्या
विरोधात कदाचित ईच्छा नसतानाही
लढावं लागलं.
पण ,कुस्तीला जेवढा काही
कालावधी लागला तेवढाच
त्यांचा मनाच्या विरोधातला विरोध होता .
नंतर हर्षवर्धन सदगीर विजयी झाला
पण त्याने स्वतःच्या विजयाचा जल्लोष न करता
स्वतःच्या पराभूत मित्राला
खांद्यावर उचलून घेऊन मिरवले .
ह्यातून माणसाने एकच शिकायला
हव किंवा बोध घेयला हव
आयुष्यात कितीही मोठ व्हा
कितीही यश संपादन करा
पण कोणाचा पाय ओढून नाही तर
आपल्याकडे कौशल्यातून व सामर्थ्यातून मोठे व्हा .
मनाचा मोठेपणा ठेऊन यशाचा आनंद घ्या आपल्या
मित्राकडे अथवा आपल्या माणसाकडे दुर्लक्ष करू नका .
आता कदाचित काही जण म्हणतील
हर्षवर्धन सदगीर ने हि फॉर्मालिटी केली ,
शेवटी ज्याच्या त्याचा बघण्याचा दृष्टिकोन.
मला वयक्तिक तर ह्यात
दडलेली कट्टर मैत्री व
मनाचा मोठेपणा दिसला .
धन्यवाद 🙏🏻🙏🏻