कर्जत :- कॉलेज प्रशासनाविरोधात गेल्याने शिक्षकाचा पगारावर टाच, नेरळ दिलकॅप कॉलेज येथील धक्कादायक प्रकार दिलकॅप कॉलेज पुन्हा वादाच्या भोवऱ्यात 
कॉलेज प्रशासनाविरोधात गेल्याने शिक्षकाचा पगारावर टाच, नेरळ दिलकॅप कॉलेज येथील धक्कादायक प्रकार


दिलकॅप कॉलेज पुन्हा वादाच्या भोवऱ्यात


 


कर्जत दि.23 गणेश पवार


 


             विद्यार्थ्यांची लूट करून कॉलेजमध्ये सुविधांची वानवा तर चुका केल्याने सिनेट सदस्यांनी फैलावर घेतलेले कर्जत तालुक्यातील मंमदापूर येथील दिलकप कॉलेज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.  आपल्याला पीएफ  मिळाला पाहिजे अशी मागणी करून महाविद्यालय प्रशासनाविरोधात गेल्याने एका शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा सहावा वेतन लागू झालेल्या पगारावर महाविद्यालयाने टाच आणली आहे. पगार कमी केल्या प्रकरणी कॉलेज प्रशासनाकडून दाद मागून मिळत नसल्याने अखेर त्या कर्मचाऱ्याने कॉलेज प्रशासन विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे मदत मागीतली आहे. 


                संतोष धोंडू धनवी अस या या शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे नाव असून ते २०११ पासून नेरळ ममदपूर येथील दिलकप कॉलेज मध्ये कार्यशाळा शिक्षक म्हणून काम करीत आहेत. सुरवातीला कामाला सुरवात केल्यापासून त्यांना १५ हजार ८१५ रुपये पगार मिळत होता. त्यानंतर शासनाचा सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर त्यांना पगार वाढ झाली होती. त्यामुळे २७ हजार १५१ रुपये त्यांना मिळू लागले. मात्र त्यानंतर धनवी यांना कार्यालयात बोलावून घेऊन तुमचा एवढा पगार मी देऊ शकत नाही. शासनाने माझ्यावर ६वा वेतन आयोग जबरदस्ती लादला आहे. तेव्हा तुम्ही स्वेच्छेने कमी पगार घेत आहेत असे जबरदस्ती लिहून घेतले. मध्यंतरी कॉलेजमध्ये आलेले भविष्य निर्वाह निधी ( पीएफ) चे अधिकारी यांना आपण कामावर रुजू झाल्यापासून पीएफ हवा आहे असे सांगितले होते. मात्र कॉलेज प्रशासनाला कोणालाच पीएफ द्यायचा नव्हता. त्यामुळे त्यांनी सर्वांकडून तसे लेखी घेतले होते. मात्र आपण द्यायला तयार नव्हतो म्हणून त्यांनी तो राग माझ्यावर काढला असल्याचे धनवी यांनी सांगितले आहे.  घरी अपंग पत्नी, आजारी मुलगी आणि त्यात कमी झालेला पगार या सगळ्याने पुरते गाळून गेलेले संतोष धनवी यांनी दिलकप महाविद्यालयाच्या कार्यालयात खूप गयावया केल्या. सगळ्या शिक्षकांना कर्मचाऱ्यांना ६वा वेतन आयोग लागू झाल्यापासून वेतन सुरळीत आहे पण मग मलाच कमी का ? असे प्रश्न विचारले. मात्र कामावरून काढून टाकण्याच्या धमकीने त्यांनी मौन बाळगले. पण अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो या उक्ती नुसार आपण याविरुद्ध लढा देण्याचे धनवी यांनी ठरवले व त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे आपली कैफियत मांडली.


              महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपलीकडे तक्रार येताच दिलकॅप महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधत त्यांच्याशी चर्चा केली मात्र कॉलेज प्रशासन हे आपली चुकी मान्य करायला तयार नसल्याने आणि उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने ती चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे येत्या ४ फेब्रुवारी पर्यंत धनवी यांचा पगाराचा विषय मार्गी लावला नाहीत तर मनसे स्टाईल आंदोलनाला कॉलेजला सामोरे जावे लागेल असा इशारा मनविसेचे रायगड जिल्हा सचिव प्रसन्न बनसोडे यांनी दिला आहे.  


           यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे स्वप्निल शेळके,ऋषीकेश पाटील, प्रविण राणे, प्रविण कोळंबे, हरेश भाटकर, बाबासाहेब गुडदे आदी उपस्थित होते. दरम्यान या सगळ्या प्रकरणाबाबत कॉलेज प्रशासनाशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकलेली नाही. 


 


 


चौकट 


 


या अगोदर दिलकॅप महाविद्यालयाच्या प्रशासनाने अवाजवी फी वाढ केल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी युवासेनेचे नेतृत्वाखाली उत्स्फूर्त आंदोलन केले. या आंदोलनामुळे शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. आंदोलनामुळे महाविद्यालयात दाखल झालेल्या सिनेट सदस्यांनी हा प्रकार उघडकीस आणला होता.  कॉलेज प्रशासन विकास शुल्क, संगणक शुल्क, स्टेशनरी फी अशा विविध माध्यमातून विद्यार्थ्यांकडून पैसे उकळत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार होती. अनेक प्रकारचे शुल्क घेऊन प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना कोणतेही शैक्षणिक सुविधा नसल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. या प्रकरणी विद्यार्थी आक्रमक झाले होते. युवसेनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी हे अवाजवी आणि अन्यायकारक शुल्क कमी केल्याशिवाय कॉलेजचे कामकाज होऊ न देण्याचा निर्धार करत कॉलेज बंद पाडले होते. यासाठी शेकडो विद्यार्थी एकवटले होते. या आंदोलनामुळे कॉलेज प्रशासन वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आता शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा पगार कमी केल्याच्या कारणावरून दिलकॅप महाविद्यलय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. 


 


 


 


दिलकॅप महाविद्यालयांत मी मागील ८ वर्षांपासून वर्कशॉप इन्स्ट्रक्टर म्हणून काम करीत आहे. मी माझे काम नेटाने आणि प्रामाणिकपणे करीत होतो. मागे कॉलेज मध्ये भविष्य निर्वाह निधी (पीएफ) चे अधिकारी आले होते मी त्यांना सांगितले कि मला मी कामावर रुजू झाल्याच्या दिनांकापासून पीएफ हवा आहे. मात्र कॉलेज प्रशासनाला तो द्यायचा नव्हता. मी त्यांच्या विरोधात बोलल्याने तो राग त्यांनी माझा पगार कमी करून काढला आहे. माझ्यावर अन्याय करू नका असे मी वारंवार कॉलेज प्रशासनाला सांगितले मात्र त्यांनी माझे काहीही ऐकले नाही उलट कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे मी या अन्याया विरोधात मनविसे कडे तक्रार दिली आहे. 


संतोष धनवी, शिक्षकेतर कर्मचारी दिलकॅप महाविद्यालय 


 


 


दिलकॅप महाविद्यालय येथे काम करीत असलेल्या संतोष धोंडू धनवी यांचा पगार विनाकारण कॉलेज प्रशासनाने कमी केल्याची तक्रार त्यांनी आमच्याकडे केली. त्यानुसार आम्ही दिलकॅप महाविद्यालय यांच्याशी चर्चा देखील केली. मात्र आपण केलेली चूक सोडून कॉलेजच्या लेटरपॅड वर कॉलेज प्रशासनाने दिली माहिती खोटी असल्याचे धादांत खोटे कॉलेज प्रशासनाचे अर्जुन कपूर हे बोलत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना ४ फेब्रुवारी पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कॉलेजवर हल्लाबोल करेल. आणि मनसेचे आंदोलन त्यांना झेपणार नाही एव्हडे मात्र नक्की त्यामुळे त्यापूर्वी त्यांनी त्या कर्मचाऱ्याच्या पगाराचा विषय मार्गी लावावा. 


प्रसन्न बनसोडे,    


  


 

 

फोटो ओळ 

दिलकॅप कॉलेज 

छाय ः  गणेश पवार