गायक झुबीन नौटियाल आज नागपूरात -------------------------------------

गायक झुबीन नौटियाल आज नागपूरात
-------------------------------------
नागपूर:-दि.२३.जाने.(सविता कुलकर्णी):- केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या संकल्पनेतून  साकार खासदार क्रिडा महोत्सव 2020 पर्व तिसरे चे आयोजन नागपूर दि. 12ते 24 जानेवारी 2020 दरम्यान करण्यात आले आहे. या समारोप करीता विशेष आमंत्रित प्रसिद्ध क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व प्रसिद्ध गायक झुबीन नौटियाल व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ,महापौर संदिप जोशी, माजी पालकमंत्री चंद्र शेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा क्रिडा भूषण पुरस्कार  या वर्षीसुद्धा देण्यात येणार आहे. या अनुषंगाने  नागपूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट योगदान बद्धल भाऊ काणे यांच्या नावाची निवड क्रीडा महर्षी पुरस्कारासाठी आली असून पुरस्काराचे स्वरुप रुपये 5 लाख व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्मात येईल. त्याचप्रमाणे क्रीडा भूषण पुरस्कार क्रीडा महोत्सवातील 31 क्रीडा प्रकारात सिनीयर प्लेयर रिसेन्ट, उत्कृष्ट वर्ष भरातील कामगिरीच्या आधारे निवड करण्यात आली. पुरस्काराचे स्वरुप रु. 25000/- व स्मृती चिन्ह देण्यात येईल.