सुसंस्कृत आणि चारित्र्यसंपन्न राजा म्हणजे #छत्रपती_संभाजी_महाराज 

सुसंस्कृत आणि चारित्र्यसंपन्न राजा म्हणजे #छत्रपती_संभाजी_महाराज
संकटाच्या भयाण शांततेत कर्तुत्वाने गगन भेदी नागारे वाजविणाऱ्या रणधुरंदर सिंहासनाधिश्वर शिवपूत्र छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या तमाम रयतेला मनःपूर्वक शुभेच्छा ...! 


छत्रपती संभाजी महाराजांचा ३४० वा राज्याभिषेक सोहळा डेक्कन येथे उत्साहात संभाजी ब्रिगेड पुणे शहराच्या वतीने संपन्न झाला  . संभाजी महाराज आपल्या केवळ ३२ वर्ष्याच्या आयुष्यात एकही लढाई हरले नाहीत उलट त्यांनी नखक्षिखा, नायिकाभेद, सातसातक, बुधभूषण या ग्रंथांची निर्मिती केली...
या प्रसंगी पहिल्यांदाच महिलांच्या हस्ते ५ नद्यांचं पाणी आणून दही दुधाचा राज्याभिषेक छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावर संपन्न करण्यात आला.. भगवा ध्वजारोहन महिलांच्या हस्ते करण्यात आले. सुवर्णा बनबरे यांची जिजाऊ वंदना तर स्नेहल पायगुडे यांनी पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या प्रसंगी ब्रिगेडचे केंद्रीय निरक्षण विकास पासलकर , गंगाधर  बनबरे सर  मा दत्ता खाडे ,मा चंद्रकांत मोकाटे. बाळासाहेब बोडके, डॉ सुवर्णा नाईक निंबाळकर, वैशाली चांदणे, ऍड रुपाली ठोंबरे, सोनाली मारणे, पूजा झोळे, वनिता अन्वने, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रशांत धुमाळ, मंदार बहिरट, सचिन जोशी  जोशी यांनी केले. विराज तावरे यांनी सूत्रसंचालन केले.
                संभाजी ब्रिगेड पुणे