माथेरानचे तापमान 12.4अंशावर

 




माथेरानचे तापमान 12.4अंशावर0

 

 

 

 

गिरीस्थानावर वसलेले पर्यटनस्थळ म्हणूंन माथेरान शहर प्रसिद्ध आहे.समुद्रसपाटीपासून 803 मीटर उंचीवर असलेलं टुमदार शहर.इतर शहरांपेक्षा माथेरानचे उंची फारच कमी आहे पण येथील घनदाट जंगलामुळे येथील गुलाबी थंडीचे प्रमाण जास्त असते.यावेळेस सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करणारी रात्र माथेरानकरांसाठी व पर्यटकांसाठी थंडीची रात्र ठरली.31 डिसेंम्बर ला माथेरान चे तापमान चक्क 12.4 अंशावर गेल्यामुळे पर्यटकांनी गुलाबी थंडीचा मनमुराद आनंद घेतला.

 

                  31 डिसेंबर साजरा करण्यासाठी

 

फार मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले होते. चार दिवसांपूर्वी मिनिट्रेन सुरू झाली व 31 च्या रात्री पर्यटकांनी येथील गुलाबी थंडी अनुभवली.माथेरान मधील सर्व हॉटेल्स फुल्ल असताना मिनिट्रेन आणि गुलाबी थंडी याचा पुरेपूर आनंद पर्यटकांनी घेतला.31 च्या दिवशी

 

5 हजार दोनशे पर्यटक आले तर मागील दोन दिवसांपासून पर्यटक माथेरानच्या निसर्गाचा अनुभव घेत होते.त्यामुळे माथेरान फुल्ल झाले होते.

 

                मागील दहा वर्षातील सर्वात नीचांक असून या गुलाबी थंडीमुळे पर्यटक मंत्रमुग्ध झाले आहेत.

 

----------------------------------

 

माथेरान मधील तापमान केंद्रात आम्ही दररोज तापमानाची नोंद करत असतो आज सकाळी तापमानाची नोंद केली असता 12.4 इतकी नोंद झाली सरत्या वर्षातील हा नीचांक असून पुढील काही दिवसात माथेरानचे तापमान यापेक्षाही खाली येऊ शकते.

 

                    अन्सार महापुळे,तापमान निरीक्षक

 

----------------------------------

 

माथेरान मध्ये दाखल झाल्याझाल्या आम्हाला तिहेरी संगम अनुभवण्यास मिळाला.मिनिट्रेन,गुलाबी थंडी आणि 31 चे सेलिब्रेशन यामुळे माथेरानची पिकनिक मजेशीर 

 

म्हणजे पैसे वसूल झाली.त्यामुळे माथेरान मध्ये वारंवार यावेसे वाटते.

 

                आशिष वंजारे,पर्यटक मुंबई

 

----------------------------------

 

माथेरान मध्ये या वर्षी आठ हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.गेल्या अडोतीस वर्षात सर्वाधिक पाऊस माथेरान मध्ये पडला होता.त्यामुळे यावर्षी सर्वाधिक पाऊस पडला असून पावसानंतर सर्वाधिक थंडी येथे पडेल असा अंदाज येथील स्थानिक लावत आहेत.

 

फोटो ओळ

छाय ः गणेश पवार