शूरवीर जिवाची महाले यांचे शौर्य प्रेरणादायी-योगेश समेळ*

*शूरवीर जिवाची महाले यांचे शौर्य प्रेरणादायी-योगेश समेळ*


    छ.शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक म्हणून शूरवीर जिवाजी महाले यांनी त्यांचे प्राण प्रसंगावधान राखत वाचवले ते शौर्य आजच्या पिढीला प्रेरणादायी असेच आहे असे प्रतिपादन नगरसेवक योगेश समेळ यांनी केले. ते शूरवीर जिवाजी महाले यांच्या ३१०व्या स्मृती दिनानिमित्त बारा बलुतेदार समाज विकास संघ व सकल नाभिक समाज व शूरवीर जिवाजी महाले स्मारक समितीच्यावतीने आयोजित अभिवादन सभेत बोलत होते. 
   शूरवीर जिवाजी महाले चौक रास्ता पेठ येथे नगरसेवक योगेश समेळ यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.अध्यक्षस्थानी सचिव राजेंद्र पंडित होते.याप्रसंगी शूरवीर जिवाजी महाले यांची वीरता व समय सूचकता या विषयावर प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी यांचे  व्याख्यान झाले. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक दत्ताभाऊ जाधव, कार्य सदस्य चंद्रशेखर जावळे,उस्तवप्रमुख रोहीत यवतकर,परिट समाज संपर्कप्रमुख सुनिल शिंदे, शहराध्यक्ष राजेश भोसले,सिंहगड रोड नाभिक विकास मंडळ अध्यक्ष निलेश चातुर,मराठवाडा मंडळाचे प्रमुख दिनकर चौधरी,कोथरुड अध्यक्ष उमेश क्षीरसागर,पर्वती अध्यक्ष सूर्यकांत भोसले,कसबा अध्यक्ष विनायक गायकवाड,रास्ता पेठ प्रमुख दत्ता पंडीत,विनायक साळुंके,दिपक डेंगे आदी उपस्थित होते. 
सूत्रसंचालन रोहीत यवतकर तर आभार राजेश भोसले यांनी मानले.