आजोबा आणि नातू यांच्यातील संवादाने नेरळकर भारावले...



आजोबा आणि नातू यांच्यातील संवादाने नेरळकर भारावले...

एलएईएस शाळेच्या स्नेहसंमेलनात आपल्या संस्कृतीची करून दिली आठवण

कर्जत,दि. 14 गणेश पवार

                          आजच्या बदललेल्या समाज परिस्थितीत आजोबा आणि नातवंडे यांचे नाते दिसेनासे झाले आहे.मात्र घरातील नातवंडे यांचा खरा आधार हे त्यांचे आजी आजोबा असतात.या गोष्टीचा पडलेला विसर यांची आठवण करून देण्याचे काम नेरळ येथील एलएईएस शाळेच्या वार्षिक स्नेह संमलेनात दिसून आले.त्याचवेळी व्यासपीठावर सादर झालेला शिवराज्याभिषेक सोहळा,तेथे अवतरलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि महिला सन्मान निमित्त सादर झालेली नृत्य यामुळे यावर्षीचे स्नेह संमेलन नेरळकरांच्या स्मरणात राहणार ठरले आहे.

                             कर्जत तालुक्यातील नेरळ येथे असलेली एलएईएस ही इंग्रजी माध्यमाची शाळा त्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे निमित्ताने नेहमीच पालकांसाठी संदेश देणारी ठरत असते.यावर्षी आजोबा आणि नातवंडे हा कुटुंबाला जोडणारा महत्वाचा दुवा हरवत चालला असून त्यावर यावर्षीचे वार्षिक स्नेह संमेलन सादर झाले.संगम 2020 या नावाने साजऱ्या झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात मोठ्या वर्गाचे सांस्कृतिक कार्यक्रम कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, कर्जत पंचायत समितीच्या सभापती सुजाता मनवे,जिल्हा परिषद सदस्या रेखा दिसले,नेरळ ग्रामपंचायतचे सरपंच रावजी शिंगवा,उपसरपंच शंकर घोडविंदे,यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य मंगेश म्हसकर,प्रथमेश मोरे,गीतांजली देशमुख,उमा खडे,शिवाली पोतदार,माजी उपसरपंच सुमन लोंगले,आदी उपस्थित होते.

                         सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका अजिता नायर यांनी प्रास्ताविक करताना आपली शाळा इंग्रजी माध्यमाची असली तरी सर्वसमावेशक शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले.जन्माला आलेल्या माणसामध्ये काही तरी त्रुटी असतात,पण त्यातून समाजाला काही देण्याचे काम होत असते.अशावेळी आपल्याकडे असलेले दुसऱ्याला दिल्यास समाज परिवर्तनात त्याचा निश्चित फायदा होतो असा विश्वास व्यक्त केला.नेरळ गावचे सरपंच रावजी शिंगवा यांनी नेरळ मध्ये कनिष्ठ महाविद्यालये आहेत, पण दर्जेदार शिक्षण देत असलेल्या शाळेने अकरावी आणि बारावी पर्यंत आपल्या संस्थेचा विस्तार करावा असे आवाहन संस्था प्रमुख यांना केले.एलएईएस शाळेने यावर्षी आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी असलेले आणि शाळेचे पहिले डॉक्टर डॉ स्वप्नील दिनकर सरोदे तसेच दहावीच्या परीक्षेत पहिले आणि दुसरे आलेले विद्यार्थी यांचे पालक रेश्मा किशोर जैन,किशोर जैन तसेच सीमा रमेश देशमुख आणि रमेश देशमुख यांना देखील प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते.

                              भव्य व्यासपीठ आणि मागे लावलेली मेगा स्क्रीन अशा स्थितीत एलएईएस शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नेरळ-कर्जत रस्त्याजवळ असलेल्या शाळेच्या मैदानात साजरे झाले.यावर्षी शाळेने आपल्या वार्षिक स्नेह संमलेनात 'आपल्या मुलांची शिकवण'या थीमवर आधारित आजोबा आणि नातवंडे यांच्या नात्याचा उलगडा व्यासपीठावर जीवनात मोठे होत असताना आवश्यक असलेले विविध दाखले देऊन तो प्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला.मात्र कार्यक्रमाची केलेली सुरुवात आणि सुरुवातीचे नृत्य यात सहभागी झालेले 200 हुन अधिक विद्यार्थी यांनी तब्बल 30 मिनिटे नॉनस्टॉप पणे सादर केलेले प्रारंभिक नृत्य यामुळे स्नेह संमेलनाची भव्यता स्पष्ट केली.

                                  यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळ्या वेगळया पध्दतीने सादर करून पालकांची वाहवा मिळविली. त्याचवेळी तेथे अवतरलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उभी केलेली प्रतिमा आणि त्यावर आधारित सादर केलेला प्रसंग यामुळे काहीकाळ बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणी कशी होती याची आठवण करून देण्याचा प्रयत्न प्रेक्षकांच्या टाळ्यांनी यशस्वी झाल्याचे दिसून आले.तर महिला सन्मान वर विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत महिलांचा सन्मान राखला पाहिजे असा संदेश देण्याचा प्रयत्न झाला.त्यात हिरकणी आणि माणिकर्णिका यांच्या गाण्यांवर झालेले नृत्य सर्वांच्या टाळ्या मिळवून गेले.महात्मा बापूजी गांधी यांचे प्रेरणादायी गीत तर सध्या विद्यार्थी ज्यात अडकले आहेत त्या मोबाईल आणि पबजी चे परिणाम काय होतात हे दाखविणारे नाट्य याला पालकांनी दाद दिली.या आगळ्यावेगळ्या थीम वर आधारित कार्यक्रम यांचे दिग्दर्शन शोएब कुवारी यांनी त्यांच्या सहकारी यांच्यासह केले तर मोठ्या वर्गाचे सांस्कृतिक कार्यक्रम तब्बल चार तास चालले.

 

 

 

 

 

 

फोटो ओळ

छाय ः गणेश पवार