म्हाळूपार्वती प्रतिष्ठान (पुणे) यांच्या  वतीने भाजपच्या पुस्तकाचा लाल महाल समोर निषेध* 

प्रेस नोट 


*म्हाळूपार्वती प्रतिष्ठान (पुणे) यांच्या  वतीने भाजपच्या पुस्तकाचा लाल महाल समोर निषेध*
.......................
  भाजपाच्या विराेधात जाेरदार घाेषणाबाजी   
-------------------
  *चमकोगीरीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करू नये :  नीलेश प्रकाश निकम*


पुणे:


भारतीय जनता पक्षातर्फे प्रकाशित ''आज के शिवाजी - नरेंद्र माेदी'' या पुस्तकाचा आज पुण्यातील लाल महालसमाेर म्हाळूपार्वती प्रतिष्ठान (पुणे) यांच्या  वतीने   निषेध करण्यात आला. यावेळी भाजपाच्या विराेधात जाेरदार घाेषणाबाजी करण्यात आली. तसेच हे पुस्तक मागे घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी म्हाळूपार्वती प्रतिष्ठान (पुणे) चे  संस्थापक अध्यक्ष    नीलेश  प्रकाश निकम ,  प्रकाश म्हाळू निकम, सौ.पुनम शैलेश हेंद्रे, डॉ.संजय विष्णू जोशी, विलास म्हाळू निकम,  अतुल शिवाजी जोशी,  बबन म्हाळू  निकम,  विशाल शंकर सुर्वे,  शैलेश बाळासाहेब हेंद्रे, अरुण  सयाजी औचरे आदी उपस्थित हाेते.


'भाजपच्या दिल्ली कार्यालयात प्रकाशित करण्यात आलेल्या जय भगवान गाेयल लिखीत ''आज के शिवाजी - नरेंद्र माेदी'' या पुस्तकामुळे वाद निर्माण झाला आहे.हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्राचा अपमान असून महाराष्ट्र तसेच शिवप्रेमी तो सहन करणार नाही .


नरेंद्र मोदी समर्थकांच्या प्रतिमा निर्मितीच्या हौसेसाठी ,चमकोगीरीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करू नये.त्यांना ते महागात पडेल',असा इशारा नीलेश प्रकाश निकम यांनी यावेळी बोलताना दिला.


...............................................