दुश्मनी इस हद तक ही हो के जिंदगी के किसी मोड पे अगर मुलाकात हो तो शर्मिंदा न होना पडे*

*दुश्मनी इस हद तक ही हो के जिंदगी के किसी मोड पे अगर मुलाकात हो तो शर्मिंदा न होना पडे*
महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्माचार्य शरद पवार साहेब आणि आपल्या कुटील (??) डावपेचाने युती तोडून आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे संजय राऊत साहेब (किंबहुना ही लढाई एकहाती लढणारे आणि तात्पुरता विजय मिळविलेले राऊत साहेब ).... नरेंद्रभाई मोदींची अभेद्य प्रतिमा आणि देवेंद्रजींच्या झंझावाताने आणि दोघांच्या  जनमानसातील स्वच्छ प्रतिमेमुळे जणु शरपंजरीच पडलेल्या साहेबांना संजीवनी देणारे खासदार संजय राऊत (नव्वदच्या दशकातील पतित पावन संघटनेच्या रुबी हॉल ,रजनीश आश्रम,परदेशी विद्यार्थ्यांचा धुडगूस याविरुद्धच्या आंदोलनाला *सामना च्या सच्चाई* या सदरात लेख लिहून प्रसिद्धी दिली व लढ्याला बळ दिले ते याच आजच्या खलनायक ठरलेल्या राऊत साहेबांनी) - या दोघांची भेट झाली ती माझ्या कौटुंबिक स्नेही खासदार वंदनाताई चव्हाण आणि ॲड.हेमंत चव्हाण यांच्या कन्येच्या प्रियांकाच्या  विवाहप्रसंगी....१९९२ साली काका शांतीलाल सुरतवाला महापौर असताना त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात  रक्तदान क्षेत्रातील कार्याबद्दल पवार साहेबांच्या हस्ते मिळालेला पुरस्कार असो किंवा १९९६ साली माझ्या पासपोर्ट साठी संजय राऊत साहेबांनी केलेली मदत असो - सर्वच आठवणी जाग्या झाल्या....मी ज्यांच्यामुळे राजकारणात आलो ते गोपीनाथराव मुंडे साहेब ,प्रमोद महाजन साहेब ,शरदभाउ कुलकर्णी हे नेहमी म्हणायचे की " राजकारणाच्या वेळी राजकारण,विरोधकांवर तुटुन पडा - ते विरोधी पक्षाचे कामच आहे ,पण व्यक्तीगत पातळीवर वैरभाव असू नये किंबहुना स्नेहपूर्ण संबंधच असावेत " त्यात्या विषयांवर मतभेद / प्रत्येक कप्पा वेगळा करता आला पाहिजे....बहुधा त्यामुळेच ३५ वर्षाच्या सार्वजनिक जीवनात अनेकांविरुद्ध आंदोलन उभारले मात्र त्यात्या व्यक्तींशी  संबंध मधुरच राखले....एक गोष्ट मात्र निश्चितपणे कौतुकास्पद आहे - *माझे साहेब नेहमी म्हणायचे नेत्यांनी कार्यकर्त्याच्या सुख दु:खात सहभागी व्हायलाच हवे* / त्यामुळेच शरदराव ,राऊत साहेब /इतर अनेक मान्यवरांना वेळात वेळ काढून या विवाहसोहळ्यात सहभागी होताना बघून आनंद वाटला - आजच्या Commercial राजकारणात अजीतदादा ,जयंत पाटील साहेब ,वळसे पाटील साहेब हे रात्री ११ वाजता नागपूर अधिवेशनातून स्वागत समारंभासाठी पोहोचले याचा कित्ता सर्वांनी गिरवायला हवा...
*शेवटी पक्षासाठी, नेत्यांसाठी झटणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्याला नेत्याचा स्नेह* हाच मोलाचा वाटतो .... हो की नाय ....??