महाराष्ट्र भूषण पुरस्कार' देणे सुरू*               *करणे बाबत...*

प्रति, 
*मा. उद्धव ठाकरे साहेब,*
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य


*विषय - 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' देणे सुरू* 
             *करणे बाबत...*


महोदय, 


*'महाराष्ट्र भूषण पुरस्कार'* हा महाराष्ट्राचा सर्वोच्च व मानाचा सन्मान आहे. महाराष्ट्राची सर्वोच्च अस्मिता म्हणून या पुरस्कार कडे सन्मानाने पाहिले जाते. महाराष्ट्रातील सामाजिक, साहित्य, कला, क्रिडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, आरोग्य, तत्वज्ञान, पर्यावरण, समाज प्रबोधन... व ऐतिहासिक क्षेत्रात मध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा या माध्यमातून सन्मान केला जातो. महाराष्ट्रात 2014 मध्ये वादग्रस्त व्यक्तीला महाराष्ट्रभूषण सन्मान दिल्यामुळे राज्यभरात त्यांना प्रचंड विरोध झाला होता किंवा राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 2014 मधील सरकारने 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारासाठी समिती स्थापन केली होती, परंतु 'तज्ञ' सदस्य नसल्यामुळे पुरस्काराच्या निकषांमध्ये... ' जी व्यक्ती बसत नव्हती, त्या व्यक्तीचा (सरकारच्या विचाराशी सुसंगत असल्यामुळेच) चुकीच्या पध्दतीने पुरस्कार देऊन छुप्या पद्धतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. हे घटनात्मक नियमांना धरून नव्हते. त्यामुळे पुरस्काराचे अवमूल्यन झाल्यासारखे वाटते. परंतु *पुरस्काराच्या तिव्र विरोध व वादामुळे तत्कालीन सरकारने हा पुरस्कार गेल्या पाच वर्षांमध्ये देणे बंद केले.* कृपया राज्य सरकारने *'महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणे सुरू करावे...'* तसेच या वर्षापासून हा पुरस्कार 'छत्रपती शिवाजी महाराज जयंती' 19 फेब्रुवारी रोजी *'किल्ले शिवनेरी'* वर मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्याचे सुरू करावे... अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.


मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे साहेब आपल्याला विनंती आहे की, *2020 पासून 'बहुजन समाजातील'* सुसंस्कृत व समाजाशी तसेच साहित्य, साहित्य, कला, क्रिडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, आरोग्य, तत्वज्ञान, पर्यावरण, समाज प्रबोधन... आदी, सरकारच्या नियमाच्या अधीन राहून महाराष्ट्रातील बहुजन समाजातील व्यक्तीचा या वर्षापासून महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मान झाला पाहिजे अशी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याची मागणी आहे.


सरकारने *सप्तखंजेरीवादक व प्रबोधनकार सत्यपाल महाराज,* साहित्यिक व संस्कृत पंडीत डॉ. आ.ह. साळुंखे, लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर, ह.भ. प. रामदास महाराज कैकाडी (पंढरपूर), बद्रीनाथ महाराज तनपुरे, इतिहास संशोधक डॉ. जयसिंग पवार, मराठा बहुजन समाजामध्ये समता, समानता व बंधुतेचा संदेश देणारे साहित्यिक, लेखक, विचारवंत, समाजशिल्पी अभियंता मा. पुरूषोत्तम खेडेकर... इत्यादी बहुजन समाजातील व्यक्तीला हा सन्मान देण्यात यावा. त्यासाठी राज्य सरकारने तात्काळ 'तज्ञ' समिती स्थापन करावी अशी महाराष्ट्राच्या वतीने मागणी करण्यात येत आहे. *'महाराष्ट्र भुषण' पुरस्काराने महाराष्ट्राचा सन्मान वाढतो,* अभिमान वाढतो, तो तसाच अखंड महाराष्ट्रभर पुरस्कार रूपी सन्मानाने अजून वृद्धिंगत व्हावा अशी 'संभाजी ब्रिगेड'ची मागणी आहे.


मा. मुख्यमंत्री महोदय, *'महाराष्ट्र भूषण पुरस्कार...' छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी (19 फेब्रुवारी) रोजी 'किल्ले शिवनेरी' वर 'पुरस्कार वितरण समारंभ...' व्हावा ही महाराष्ट्राच्या तमाम  जनतेच्या व शिवप्रेमींच्या वतीने मागणी आहे. महाराष्ट्राचा सर्वोच्च सन्मान...  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'जन्मा स्थळावर'* होणे हे महाराष्ट्राच्या वैभवाला व संस्कृतीला साजेल असे आहे.


 *छत्रपती शिवाजी महाराज जयंती* (शिवजयंती - १९ फेब्रुवारी २०२०) जवळ आलेली आहे. यानिमित्त पुणे जिल्ह्याचे वैभव असणाऱ्या *'शिवनेरी किल्ल्यावर'* यावर्षीपासून *'महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा'* व्हावा अशी पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्य सरकारकडे मागणी करण्यात येत आहे. याबाबत 'संभाजी ब्रिगेड' मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, सांस्कृतिक, पालकमंत्री, जिल्ह्यातील सर्व खासदार, मा. जिल्हाधिकारी साहेब यांना प्रत्यक्ष भेटून यांच्याद्वारे सरकारकडे संभाजी ब्रिगेडच्या वतीने विनंती वजा मागणी करण्यात येत आहे व येणार आहे.


*▪- संतोष शिंदे,*
जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे.
       9850842703


प्रत - 
१) मा. सांस्कृतिक मंत्री, महाराष्ट्र राज्य
२) मा. जिल्हाधिकारी पुणे
२) मा. सर्व खासदार पुणे
३) मा. दै. वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक माध्यम, पुणे.