वाहतूक पोलीस व भ्रष्ट प्रशासनाच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन

वाहतूक पोलीस व भ्रष्ट प्रशासनाच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन आज रविवार दिनांक १९/०१/२०२० रोजी सकाळी १०:३० वाजता भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे जोपर्यंत कात्रज वाहतुकीच्या प्रश्नावर लेखी तोडगा दिला जात  नाही तोपर्यंत शुभम वढवकर चा मृतदेह पोलीस स्टेशनच्या दरवाजातून हलविण्यात येणार नाही या प्रकारचे आंदोलन आम्ही करणार होतो परंतु भ्रष्ट पोलीस अधिकारी, कर्मचारी व प्रशासन यांनी रातोरात मयत शुभम वढवकर याचा मृतदेह ससून हॉस्पिटल मधून ताब्यात घेऊन कात्रज ला न आणता त्याच्या पर्वती भागातील नातेवायीकांच्या ताब्यात देऊन पर्वती भागातच त्याचा अंत्यविधी करण्यास भाग पाडले आहे. अशा भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध करत आहोत.
               अशा भ्रष्ट पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे या आठ दिवसात निलंबन करावे अन्यथा येणाऱ्या रविवारी कात्रज चौक येथे आम्ही जनआक्रोश आंदोलन करणार आहोत याची नोंद घ्यावी असे निवेदन भारती विद्यापीठ पोलीस चौकी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर यांच्याकडे  देण्यात आले. या वेळी स्वीकृत सदस्य स्वीकृत सदस्य भालचंद्र पवार, सुशांत बाबर,अनिल गोविलकर, उमेश बलकवडे, राजेंद्र सूर्यवंशी, निलेश पवार,नसीर सय्यद, योगेश वाकळे, विकी सोनके, सागर भोसले, अभिषेक गुळानकर, प्रमोद पोमण,अमर जाधव, इम्रान बागवान, अमरीश करांडे हे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.