लहुजी साळवे -एक थोर आदर्श*    *जन्म  इ स १८१५ दरम्यान*

*लहुजी साळवे -एक थोर आदर्श*


   *जन्म  इ स १८१५ दरम्यान*


( जन्मतारखे संबद्धी ठाम विधान करता येत नाही 
पुण्यातील विचारवंत मा .रमेशजी राक्षे यांची आई लहुजींच्या घराण्यातील आहे , त्यांनी दिलेल्या चिकित्सक  माहिती नुसार वरील इसवी सन लिहिले आहे )


        -   मान्यवर लेखक आणि विचारवंत यांनी अभ्यासपूर्वक नमूद केल्याप्रमाणे -----


लहुजींच्या अनुषंगाने खालील कार्यं विचारात घ्यावे लागेल व त्यावर मौलिक चिंतन करावे लागेल .


१ :उमाजी नाईक या बंडखोर लढ्वय्यास राजा बनवण्यास मदत .


२:  तरुणांना व्यायाम शिकवणे .


३:  जोतिबांचे शाररिक शिक्षण गुरु .


४: बा जोतिबा अन आई सावित्रीच्या कार्यात भरीव  मदत.


५:  *माणूस व्हायचे असेल तर त्यानी जोतिबा कडून शिक्षण घ्यावे*  '-या मूल मंत्राचा त्यानी केलेला आग्रही जयघोष.


६ : जोतीबाच्या शिक्षण कार्याची हिमालयासारखी पाठराखण वा संरक्षण.


७ :  सावित्रीआईच्या वर्गाचे स्वतः हून वर्गाबाहेर बसून केलेले संरक्षण.


८:  ' बा जोतिबा मांगामहारासाठी पण शाळा काढा जी ' --अशी जोतिबास केलेली आग्रही विनंती.


९ :पुतनी मुक्ता हीस शाळेत पाठवून मुलींनी शिकू नये या रूढींचा केलेला शिरछेद.


१० : नुसते शाळेत पाठवून नाही तर मूक्तास प्रोत्साहन देवून निबंध निर्मिती पर्यंत ताकद देण्याचे कार्य.


११ :सन १८५७ च्या उठावांत देशकार्य साधण्यासाठी तरुण फौज पाठवणे .


१२ .:स्वसंरक्षणासाठी उपयोगी ट्रिक्क्स जोतीबाना देणे.


१३ : सुधारक ब्राम्हणाच्या विरुद्ध सनातन बांधवानी जातीय खटला म्हणजे ग्रामण्य लादले असता , म्हणजे त्या सुधारक ब्राह्मणांना जातीतून बहिष्कृत करण्यासंबद्धीचा खटला चालू असताना जोतीबाने खटला सुनावणी वेळी सुधारकाना संरक्षनांची हमी दिली तेंव्हा 
जोतिबाच्या या थोर कार्यासाठी सुधारकाच्या पाठीशी मांग महार रामोशी तरुणांची फौज देणे.


 १४ : *अतिशय महत्वाचे कार्य --वानवडी येथे मांग महार शाळेचा प्रयोग फेल गेल्यावर --शिक्षणाचे महत्व अगोदर पटवून द्यावे म्हणून भिडे वाडा,येथे जोतीबानी सभा घेतली तो दिवस होता*
 *२५ डिसे  १८४७* 


*सनातनी बांधवांकडून ती सभा उधळन्याची भीती होती.जोतीबानी त्या सभेचे अध्यक्षपद लहुजीना दिले होते*


सर्व पार्श्वभूमी पहाता लहूजी ज्या सभेचे अध्यक्ष होते त्या सभेचे आणि मुख्य वक्ता जोतीबाचे संरक्षण करण्यासाठी मांग महार रामोशांची  तरुण फौज निश्चित पणे गुप्त हत्यारबंद अवस्थेत लहूजीच्या प्रेरणेने आली होती याला कशाचाच पुरावा लागत नाही.
ती सभा अर्थातच व्यवस्थित पार पड़ते.अन भिड्यान्चा वाडा शिक्षण कार्यासाठी जोतीबास मिळतो ,


 १५  : स्वामी दयानंद सरस्वती पुण्यात आले असताना रानडे यानी जोतीबाना स्वामीच्या रक्षणाची गळ घातली,तेव्हा *आर्य सामाजि अस्प्रुशता मानीत नाहीत* म्हणून आणि मानवता म्हणून सुद्धा ,जोतीबानी त्यांचे रक्षण केले.अन त्यासाठी लहूजीची मांग महार रामोशि तरुण फौज त्यावेळी मदतीसाठी आली होती.


होय आणि होय !


इतके  थोर अन बलदंड होते लहूजी !
पुण्यात संगमवाडी पूलाजवळ त्यांची समाधी
 आहे .


१७ फेब्रु त्यांचा पुण्यस्मरण दिन 


लहूजीना त्रिवार अभिवादन  ! !


वरील माहीतीचे सन्माननीय संदर्भ :


१)  जोतीराव फुले चरित्र ...लेखक  धनंजय कीर 
२)  सावित्रीबाई फुले -काल व कर्तृत्व         पुण्यशताब्दी विषेशांक १९९७


धन्यवाद !


🙏🏻🙏🏻
आपलाच 
 मा धो खिलारे ,नासिक 
मो नं 7030544660