देशविरोधी घोषणा दिल्या असतील तर तात्काळ गुन्हा दाखल करा  आणि आरोपींना अटक करा......प्रशांत धुमाळ* *संभाजी ब्रिगेड पुणे शहर अध्यक्ष*

*देशविरोधी घोषणा दिल्या असतील तर तात्काळ गुन्हा दाखल करा  आणि आरोपींना अटक करा आणि खोटी तक्रार दिली असेल तर  तक्रारदार विरोधात  विरोधात सुद्धा तात्काळ गुन्हा दाखल करावा*   *संभाजी ब्रिगेड*


जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यान  बाहेर काही संघटनांनी CAA & NRC विरोधात  आंदोलन केले सदर आंदोलनात रात्री एकच्या सुमारास काही लोकांनी हुल्लडबाजी  करून देश विरोधात घोषणा दिल्या असा आरोप *पुणे खासदार पुत्र गौरव बापट* यांनी केला आणि त्या संदर्भात त्यांनी डेक्कन पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली


*पोलिसांनी तात्काळ या संदर्भात योग्य ती पावले उचलून सीसीटीव्ही फुटेज त्याठिकाणी उपस्थित असलेले पोलिस कर्मचारी यांच्याकडून योग्य ती माहिती घेऊन जर कोणी देश विरोधात घोषणाबाजी केली असेल तर त्यांच्याविरोधात तात्काळ  गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी कोठडीत करावी*


मागे असेच प्रकरण फर्ग्युसन महाविद्यालय घडले होते तत्कालीन प्राचार्य परदेशी यांनी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये अशीच तक्रार दाखल केली होती परंतु कुठलीही ठोस पुरावे नाही आणि काही संघटनांना जाणून-बुजून बदनाम करायचं म्हणून तक्रार दिली होती आणि ती तक्रार नंतर तीन दिवसांनी  माघारी घेतली यामुळे धर्माधर्मात जाती-जातीत विनाकारण तेढ निर्माण झाला होता  आणि पुण्यासारख्या सांस्कृतिक शहराच्या सामाजिक सलोख्याचा वातावरण बिघडल होते
*याप्रकरणी सुद्धा पुणे पोलिसांनी सर्व पुरावे बारकाव्यानिशी तपासावे  व आपला अहवाल २ दिवसात सादर करावा आणि सदर तक्रारी मध्ये जर कुठल्याही प्रकारचे तथ्य आढळले नाही तर दोन समुदायात जाणीवपूर्वक तेढ निर्माण होईल म्हणून तक्रार देणाऱ्या  विरोधात सुद्धा तात्काळ गुन्हा दाखल करावा* म्हणजे भविष्यात अशा चुकीच्या गोष्टींना आळा बसेल
     
            *प्रशांत धुमाळ*
    *संभाजी ब्रिगेड पुणे शहर अध्यक्ष*
९८८१४०२२४१


Popular posts
मा.उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी आपले शासकीय वाहन जमा करून खाजगी वाहनाने प्रवास केला.
Image
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा पदवीप्रदान समारंभ गुरुवार ३ सप्टेंबर, २०२० रोजी 
Image
जगजौत्या सिंकदर ला ही ज्याप्रमाणे भारता मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले ,त्याप्रमाणे कोरोना ही पराभूत होणार....
Image
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११७ व्या पदवीप्रदान समारंभासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात अर्जाचा नमुना, शुल्क इत्याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या convocation.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान