अमेरिकेच्या हवाई तळावर मोठा हल्ला; ७ विमाने उडवली. __________________________________

अमेरिकेच्या हवाई तळावर मोठा हल्ला; ७ विमाने उडवली.
__________________________________


रविवारी सकाळी सोमालियाच्या इस्लामिक दहशतवादी  संघटनेने अल-शबाबने केनियाच्या लामा काउंटी येथे अमेरिकन एअरबेसवर हल्ला केला. या हल्ल्यात ७ विमाने आणि ३ वाहने उध्वस्त करण्यात आली आहेत. मात्र, या हल्ल्यात अद्याप जीवितहानी झालेली नाही. लामू काउंटीचे आयुक्त इरुंगा मचारिया यांच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्याप्रकरणी ५ संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.
केनियाच्या लामू काउंटीच्या 'मंदा बे' मध्ये अमेरिका आणि केनियाच्या संयुक्त लष्करी विमानतळ आहेत. पेंटागॉनच्या म्हणण्यानुसार, सुमारे १०० अमेरिकन सैनिक लष्करी छावणीत आहेत. अल शबाबच्या प्रवक्त्याने अल जझिराला या मीडिया समूहाला सांगितले की, हल्ल्याचा मध्य-पूर्वेतील (अमेरिका - इराण)  सुरू असलेल्या वादाशी काही संबंध नाही.