शहिद भाई कोतवाल चित्रपट बघा आणि माथेरान मधील निशुल्क प्रवेश करा-नगराध्यक्ष सावंत






शहिद भाई कोतवाल चित्रपट बघा आणि माथेरान मधील निशुल्क प्रवेश करा-नगराध्यक्ष सावंत

माथेरान गिरीस्थान नगरपालिका कार्यालय आणि हुतात्मा स्मारकात लागले हुतात्मा हिराजी पाटील यांचे फोटो...

नगराध्यक्ष आणि हुतात्मा स्मारक समिती चा पुढाकार

कर्जत,दि .19 गणेश पवार

               हुतात्मा भाई कोतवाल यांच्यासोबत लढ्यामध्ये त्यांच्या सोबत हुतात्मा झालेले हिराजी गोमाजी पाटील यांचे फोटो माथेरान गिरीस्थान नगरपालिका कार्यालयात तसेच माथेरान मधील हुतात्मा भाई कोतवाल स्मारकात नव्हते.त्यासाठी माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी हुतात्मा स्मारक समिती यांच्या पदाधिकारी यांना फोटो प्रतिमा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले होते. दरम्यान,हुतात्मा स्मारक समितीने हुतात्मा हिराजी पाटील यांचे जन्म दिवशी त्यांच्या प्रतिमा हुतात्मा स्मारक आणि नगरपालिका कार्यालयात लावण्यात आल्या.यावेळी महत्वपूर्ण घोषणा माथेरान गिरीस्थान नगरपालिकेच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी केली असून 24 जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा शहीद भाई कोतवाल हा चित्रपट पाहणाऱ्या पर्यटकांना माथेरान मध्ये प्रवेश करताना प्रवेश करामधून सूट देण्यात येईल आणि पुढील वर्षभर ही सवलत राहणार आहे.

               माथेरान गिरीस्थान नगरपालिका कार्यालय आणि हुतात्मा भाई कोतवाल यांच्या स्मारकात 2 जानेवारी 1943 रोजा हुतात्मा झालेले हुतात्मा हिराजी पाटील यांची प्रतिमा नव्हती.त्यामुळे त्यांची प्रतिमा उपलब्ध करून देण्याचे आवाहन नगराध्यक्ष प्रेरणा प्रसाद सावंत यांनी केले होते.त्यानंतर हुतात्मा स्मारक समिती या संघटनेच्या वतीने हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या प्रतिमा 2 जानेवारी 2020 रोजी नेरळ येथे हुतात्मा चौकात झालेल्या कार्यक्रमात स्मारक समितीच्या वतीने नगराध्यक्ष सावंत यांनी सुपूर्द करण्यात आल्या होत्या.हुतात्मा हिराजी पाटील यांची आज 19 जानेवारी रोजी जयंती असल्याने त्या दिवसाचे औचित्य साधून माथेरान नगरपालिका प्रशासनाचे वतीने लहानसा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.माथेरान गिरीस्थान नगरपालिका कार्यालयात आज 19 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता हुतात्मा हिराजी पाटील यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून त्यांना अभिवादन नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी केले.त्यावेळी नगरसेवक शकील पटेल,माजी नगरसेवक दिनेश सुतार,कार्यालय अधीक्षक रणजित कांबळे, रत्नदीप प्रधान,राजेंद्र रांजणे आदी हजर होते.

                            त्यानंतर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या माथेरान मधील स्मारकात हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या प्रतिमा नव्याने लावण्यात आल्या. त्या दोन्ही प्रतिमांचे पूजन नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी केल्यानंतर हुतात्म्यांचे प्रतिमा यांना पुष्पहार प्रेरणा सावंत आणि नगरसेवक शकील पटेल घालून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी माजी नगरसेवक प्रदीप घावरे,दिनेश सुतार,अमित भस्मा आणि पालिकेचे कार्यलय अधीक्षक रणजित कांबळे,अन्सार महापुळे,तसेच कोतवाल ब्रिगेड चे अध्यक्ष रोहिदास क्षीरसागर आदी उपस्थित होते.या दोन्ही कार्यक्रमाना शहीद भाई कोतवाल यांचे चित्रपटाचे दिग्दर्शक एकनाथ देसले आणि हुतात्मा हिराजी पाटील यांची भूमिका करणारे कलावंत परेश हिंदुराव हे उपस्थित होते.हुतात्मा हिराजी पाटील यांच्या कार्याची माहिती एकनाथ देसले यांनी करून दिली.तर हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष पेरणे यांनी दोन्ही ठिकाणी प्रतिमा लावण्यात आल्याबद्दल माथेरान गिरीस्थान नगरपालिका आणि नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांचे आभार मानले.त्यावेळी हुतात्मा स्मारक समितीचे अजय कदम, गणेश पवार,गणेश पुरवंत,श्वेता शिंदे,आदी उपस्थित होते.

                           यावेळी बोलताना माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी हुतात्मा भाई कोतवाल यांचा इतिहास जिवंत होत असून त्याबाबतचा चित्रपट 24 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.त्यामुळे तो चित्रपट थिएटर मध्ये जाऊन पाहिला असल्याची तिकीट माथेरान ला पर्यटनासाठी येताना सोबत आणली तर अशा देशप्रेमी पर्यटक यांच्या कडून प्रवासी कर घेतला जाणार नाही.ही सवलत वर्षभर सुरू राहणार असून पर्यटकांसाठी ही मोठी घोषणा असून माथेरान मध्ये येणारे पर्यटक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.