प्रतिष्ठित "पुणे प्राईड अवॉर्ड्स २०१९" जाहीर रेसिडेन्सी क्लब तर्फे २८ वा पुणे प्राईड अवॉर्ड सोहळा

प्रतिष्ठित "पुणे प्राईड अवॉर्ड्स २०१९" जाहीर 


रेसिडेन्सी क्लब तर्फे २८ वा पुणे प्राईड अवॉर्ड सोहळा


पुणे २ जानेवारी, २०१९- १९९१ मध्ये सुरू झालेला रेसिडेन्सी क्लब हा पुण्याचे महत्वाचे संस्कृतिक स्थळ आहे. १९९२ सालापासून रेसिडेन्सी क्लब तर्फे विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना त्यांनी केलेल्या अनुकरणीय कार्याबद्दल पुणे प्राईड अवॉर्ड दिला जातो.हा गौरव त्या लोकांना  दिला जातो जे त्यांच्या थोर कामगिरीसाठी  परिचित आहे. स्पोर्ट्स, कॉर्पोरेट, कला आणि शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना  हा विशेष गौरव देऊन सन्मानित केले जाते .


 


रेसिडेन्सी क्लबच्या अनुभवी व नामांकित सल्लागार मंडळाच्या निवड समितीद्वारा ७ विख्यात लोकांना या वर्षीचा २८ वा पुणे प्राईड अवॉर्ड देण्यात येणार आहे. 


७ जानेवारी २०२० हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आज पुण्यात पत्रकार संघात झालेल्या पत्रकार सम्मेलनात ही माहिती देण्यात आली. प्रमुख अतिथी पद्मभूषण श्री. शेखर गुप्ता ( प्रख्यात पत्रकार, संस्थापक आणि संपादक 'द प्रिंट ऑण्ड होस्टचे प्रमुख - एनडीटीव्ही 24 * 7 वर वॉक द टॉक साठी विख्यात) यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातील. 



 


लाईफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार  श्री.   नितीन देसाई यांना प्रदान करण्यात येईल ज्यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही आणि त्यांनी आपले संपूर्ण जीवन हे शिक्षण, वैद्यकीय आणि धर्मादाय क्षेत्रात गरीब आणि गरजूंना समर्पित केले आहे. ते देसाई ब्रदर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत याचबरोबर ते प्रसिद्ध लोणचे आणि मसाले ब्रँड मदर्स रेसिपीचे मालक देखील आहेत. 


 


श्री. प्रदीप भार्गव यांना कॉर्पोरेट कॅटेगरी मध्ये त्यांच्या अविस्मरणीय कामगिरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात येईल. कमिन्समध्ये   कार्याबरोबरच ते सीआयआय सक्रिय सदस्य आणि एमसीसीआयएचे विद्यमान अध्यक्ष आहेत. या व्यतिरिक्त त्यांना आपल्या क्षेत्रात दीर्घ काळाचा  अनुभव आहे.


 


देश सेवा आणि सुरक्षेसाठी आपले जीवन समर्पित करणार्या बहादुर सैनिकांच्या  बलिदानाची आठवण करत ज्यांनी देशसेवेसाठी आपले प्राण  गमावले  अश्या विर सैनिकांच्या पत्नींना यावेळी शिलाई मशीन भेट देण्यात येईल.  



पुरस्कार:


लाईफ टाइम: श्री. नितीन देसाई


 कॉर्पोरेट: श्री. प्रदीप भार्गव


 सोशल वर्क : श्रीमती. रितु छाबरिया


 आर्ट अँड कल्चर :श्री. मुरली लाहोटी


 अकॅडमिक  :  प्रोफेसर.  उत्तम भोईटे


स्पोर्ट : श्री. नितीन कीर्तने



सल्लागार  बोर्ड सदस्य:


श्री आर.के. अग्रवाल - अध्यक्ष  ब्रम्हाकार्प ग्रुप


श्री.   एस.बी. मुजुमदार (अध्यक्ष  )


श्री.   विठ्ठल मनीयर


कर्नल. संभाजी पाटिल (सेवानिवृत्त)


श्रीमती .  सबीना संघवी


पद्मश्री . लीला पूनावाला


डॉ. के. एच. संचेती (उपाध्यक्ष)


श्री.  व्ही.एम. म्हस्के 


डॉ. मोहन आगाशे


श्री.  चंदू बोर्डे 


श्री.  हर्षद निंबाळकर