संविधान वाचवा, NPR-NRC- CAA हटवा! वर्कशॉपचे आयोजन

संविधान वाचवा, NPR-NRC- CAA हटवा!


वर्कशॉपचे आयोजन


पुणे – रविवार, दि. १२ जानेवारी २०२० रोजी सकाळी १०.३० वा. लोकायत व मुस्लिम चेंबर ऑफ कॉमर्स अड इंडस्ट्रीस यांच्या वतीने NPR-NRC-CAA को समझते! या विषयावर ऑडीटोरियम, लेडी हवाबाई स्कूल, बाबाजान चौक, पुणे कॅम्प येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. कार्यशाळेसाठी पद्मश्री पुरस्कारी, प्रख्यात नागरी अधिकार कार्यकर्ती तीस्ता सेटलवाड यांना बोलावण्यात आलेले होते. त्यावेळी विचारमंचावर निरज जैन व निसार सागर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला लोकायतचे कला पथक काफिलाने गाणि सादर केली.


तीस्ता सेटलवाड म्हणाल्या की,  CAA ला NRC बरोबर जोडून बघितलं पाहिजे. सर्व घुसखोरांना देशातून काढून टाकता यावं असं कारण देऊन ही नागरिक नोंदणी केली जातेय. पण ह्या देशामध्ये मुश्किलीने ०.२% लोक घुसखोर आहेत असं २०११ चा जनगणनेचा आकडा सांगतोय. पण सरकार त्यासाठी उर्वरित ९९.८% लोकांना वेठीला धरत आहेत. NRC चा मुद्दा हा आहे की भारतात पिढ्यानपिढ्या राहत असलेल्या लोकांना आपलं भारतीयत्व सिध्द करावं लागेल. आसाममधील परिस्थीती जनतेसमोर मांडताना त्या म्हणाल्या की, आसाममध्ये NRC ची प्रक्रिया राबवायला ५ वर्षे लागली. त्यावर सरकारचा १,२२० कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला. याशिवाय आसामच्या सामान्य माणसाला आवश्यक कागदपत्रे जमवण्यासाठी याच्या अनेक पटींनी खर्च करावा लागला आहे. एवढ करूनही आसामच्या ३.२ कोटी लोकसंख्येपैकी १९ लाख लोक त्यांची नागरिकता सिध्द करू शकले नाहीत. यामध्ये हिंदू, मुसलमान, आदिवासी, गोरखा आहेत. या संगळ्यांवर विदेशी ठप्पा लागण्याची टांगती तलवार आहे. या दरम्यान आसाममधील संपूर्ण सरकारी यंत्रणा NRC च्या कामात लावली आहे. हिच प्रक्रिया संपूर्ण देशात सुरू झाल्यावर हाहाकार माजेल यासाठी संपूर्ण जनतेने  CAA-NPR-NRC ला विरोध केला पाहिजे असे त्यांनी जनतेला आवाहन केले. 


निरज जैन म्हणाले कि, देशातील या सवैधानिक हल्ल्याला मोदी सरकारच्या दुस-या भयंकर धोरणांशी जोडून पहावे लागेल. संविधानातील मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करून संपूर्ण अर्थव्यवस्था फक्त मुठभर श्रीमंतांसाठी व त्यांच्या महाकाय कंपन्यांच्या नफेखोरिसाठीच चालवत आहे. देशातील नैसर्गिक साधनसंपत्ती, खनिज संपत्ती, मोठेमोठे सरकारी उद्योग आणि सरकारी वित्त कंपन्या भरतीय व परकीय बडया उद्योगपतींना कवडीमोल किमतीत दिल्या जात आहेत. गेल्या ५ वर्षात मोदी सरकारणे धनदांडग्यांना २० लाख कोटींची तसेच २८ लाख कोटींची करमाफी दिली आहे. परिणामी १% श्रीमंतांकडे देशाची ६०% संपत्ती एकवटली आहे. आणि सर्वात खालच्या ५०% लोकांकडे फक्त २% संपत्ती आहे. दुस-या बाजुला गरीबी, बेरोजगारी, महागाई, शेतीचे संकट यांमुळे सामान्य जनता हैराण झाली आहे. या सर्व प्रश्नांवरून सामान्य जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप सरकार CAA-NPR-NRC सारख्या धर्मांध आणि संविधानविरोधी गोष्टींचा आधार घेत आहे. 


निसार सागर म्हणाले की, संविधानाच्या नागरिकत्व तरतुदींमध्ये स्पष्ट शब्दात लिहीले आहे कि, कोणत्याही व्यक्ती बरोबर धर्म, जात, वंश, लिंग, प्रांत, भाषेच्या आधाराव भेदभाव केला जाणार नाही. पण आता बहुमताच्या जोरावर संसदेत CAA मंजुर करून घेतला आहे व NRC लागू करण्याचे जाहिर केले आहे. हे दोन्हीही भारतीय गणराज्याचे चरित्र आमूलाग्र बदलून टाकती. म्हणुन भारतीय संविधानाच्या समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत मूल्यांच्या रक्षणासाठी जनतेच्या ख-या प्रश्नांना घेवून आपल्याला सर्व धर्म, भाषा, लिंग, जातीच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून संघटीत रित्या रस्तावर उतरावे लागेल असे त्यांनी जनतेला आवाहन केले.  


कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शकुंतला यांनी केली. पुण्यातील नागरिक मोठ्या संख्येने कार्यशाळेमध्ये सहभागी होते