दिक्षाभूमीत नवयुवकांसाठी बौध्दिक मेजवानी २६ जानेवारीला

दिक्षाभूमीत नवयुवकांसाठी बौध्दिक मेजवानी २६ जानेवारीला
- इंटरनॅशनल बुध्दिस्ट युथ कॉन्सीलचा उपक्रम
नागपूर- 23 जानेवारी (सविता कुलकर्णी )
मिशन-धम्म प्रशिक्षण अंतर्गत नव तरूणांची चरित्र्यवान पिढी निर्माण व्हावी, बुध्दविहारे धम्म प्रशिक्षणाची व क्रांतीकारी धम्मसंस्काराची आदर्श केंद्रे निर्माण व्हावी या उदात्त हेतूने इंटरनॅशनल बुध्दिस्ट युथ कॉन्सील (आयबीवायसी) व डॉ़आंबेडकर स्मारक समिती दिक्षाभूमी तसेच वर्ल्ड धम्म मिशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार,२६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजतापासून दिक्षाभुमी येथे धम्म प्रशिक्षण आणि युथ सशक्तीकरण कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे.
  या समारंभाचे उद्घाटन महाथेरो भदंत आर्या नागार्जुन सुरइ ससाई यांच्या हस्ते करण्यात येईल.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) निलेश भरणे उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दिक्षाभूमीचे सदस्य विलास गजघाटे, अॅड.एन.आर सुटे, आनंद फुलझेले, डॉ़ सुधिर फुलझेले प्रामुख्याने उपस्थित राहतील.
या समारंभात तरूणांसाठी विविध विषयांवर चर्चा होणार आहे. त्याकरिता वरिष्ठ पत्रकार रंजीत मेश्राम, कायदे तज्ज्ञ डॉ. एऩ एम. ख़ीराळे, तिरपुडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केशव पाटील, प्रा.पी. के. शेंडे, रा. तू. म.नागपूर विद्यापीठ अंतर्गत बुध्दीस्ट अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. निरज बोधी, अ‍ॅड.डॉ.सोनिया गजभिये, अ‍ॅड.स्मीता कांबळे, सुधाकर शेंडे, पुष्पा बौध्द, विभा गजभिये  हे तरूणांशी संवाद साधतील.
  या कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहे.यात  वयाच्या ५ वर्षावरील मुलांची निःशुल्क बौध्दिक चाचणी (मल्टीपल इंटेलीजेंस् टेस्टींग) होणार आहे. त्याचप्रमाणे धम्म व संविधान यावर प्रश्नोत्तरी, बुध्द व त्यांचा धम्म यावर आधारित युवकांची धम्मदेसना (युथ टॅलेंट केयर), मला समजलेला धम्म व माझ्या स्वभावात आलेले परिवर्तन (युवकांचे विचार), मी डॉ. आंबेडकर बोलतोय (जिवनपट नाट्य), बुध्दांचा सारनाथ येथील प्रथम धम्मोपदेश  (नाट्य रूपांतर), बुध्द विहारे धम्म प्रशिक्षणाची की पुजेचे केंद्र यावर खुली चर्चा, धम्म कव्या भिवा दन, आंबेडकर व तथागत गौतम बुध्द यांच्या जिवनावर आधारित ‘धम्मवर्ल्ड’(धम्मजगत) या भव्य व आकर्षक प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात येत आहे.
 हे आयोजन आंबेडकरी समाजासाठी एक अत्यंत महत्वाची ऐतिहासीक घटना ठरणार आहे. या जागतिक महोत्सवाचे व प्रसंगाचे आपले बुध्द विहार एक महत्वाचे दस्ताऐवज बनूून धम्म प्रशिक्षण व प्रचाराच्या उपक्र मात सहभागी व्हावे तसेच धम्म चळवळीत आपले अमुल्य असे योगदान द्यावे असे आवाहन सेमिनरीचे अमित बंसोड, निखील बोरीये, संजिवनी मून, राजू कांबळे, दीपाली हूमने आणि सेमिनरीचे मार्गदर्शक प्रा.सुभाष शेंडे यांनी केले आहे.