पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे...

मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर बरेच दिवस चाललेल्या घोळानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. त्यानंतर अखेर मंत्रिमंडळ विस्तारात ३६ मंत्र्यांनी शपथ घेतली आणि खातेवाटपही झाले. परंतु, पालकमंत्री पदाचे वाटप मात्र झाले नव्हते, तरी पालमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे...


पुणे- श्री. अजित अनंतराव पवार
मुंबई शहर- श्री. अस्लम रमजान अली शेख
मुंबई उपनगर- श्री. आदित्य उद्धव ठाकरे
ठाणे- श्री. एकनाथ संभाजी शिंदे
रायगड - श्रीमती आदिती सुनिल तटकरे
रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब
सिंधुदुर्ग- श्री. उदय रविंद्र सामंत
पालघर- श्री. दादाजी दगडू भुसे
नाशिक- श्री. छगन चंद्रकांत भुजबळ
धुळे- श्री. अब्दुल नबी सत्तार
नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी
जळगाव- श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील
अहमदनगर- श्री. हसन मियालाल मुश्रीफ
सातारा- श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
सांगली- श्री. जयंत राजाराम पाटील
सोलापूर- श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
कोल्हापूर- श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
औरंगाबाद- श्री. सुभाष राजाराम देसाई
जालना- श्री. राजेश अंकुशराव टोपे
परभणी- श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
हिंगोली- श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड
बीड- श्री. धनंजय पंडितराव मुंडे
नांदेड- श्री. अशोक शंकरराव चव्हाण
उस्मानाबाद- श्री. शंकरराव यशवंतराव गडाख
लातूर- श्री. अमित विलासराव देशमुख
अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
अकोला- श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
वाशिम- श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई
बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
यवतमाळ- श्री. संजय दुलीचंद राठोड
नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
वर्धा- श्री. सुनिल छत्रपाल केदार
भंडारा- श्री. सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
गोंदिया- श्री. अनिल वसंतराव देशमुख
चंद्रपूर- श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार
गडचिरोली- श्री. एकनाथ संभाजी शिंदे