मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी वापरुन वडापाव विक्री *"

*"मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी वापरुन वडापाव विक्री *"


तुम्ही प्रवासात आहात , बस-स्टँण्ड मध्ये गाडी थांबली , कळकट ,मळकट कपडयातला पोऱ्या , थंडगार वडा आणि पाव वड्डा पाssssव.....असं ओरडत येतो आणि रद्दी कागदात घाणेरड्या हाताने गुंडाळून मिरची सहित देतो ! 


गरज असली की खातात कि नाही लोक ?


पण तेच तुम्ही ट्राफीक सिग्नलवर वेल ड्रेस्ड मुलं , एक बॉक्स , त्यात गरम वडा , पाव , टिश्यू पेपर , छोटी पाणी बॉटल आणि किंमत 20 रू .


कोणतं पार्सल आवर्जून घ्याल ??


गौरव लोंढे 
या , मराठमोळ्या मुलाच्या डोक्यातून निघालेली भन्नाट आयडीया 
Traffic WadaPav या ब्रॅण्डखाली त्यांची सहा जणांची टीम जोरदार पणे ठाणे ( पश्चिम) मध्ये राबवत आहे .


सबकुछ हायटेक ,, स्वतःचा ड्रेसकोड , वेबसाईट, फेसबूक पेज , आणि ग्राहकाला गरम गरम देण्याची जिद्द , हे सगळं कॉम्बीनेशन  एवढं भन्नाट जमलंय कि , हे स्टार्ट-अप फार लवकर ग्रो करेल .


आज त्यांची सहाच जणांची टीम हे करतेय उदया ही नक्कीच वाढणार वादच नाही !


हा व्यवसाय छोटा असला तरी यांनी खूपच जास्त मॅनेजमेंट प्रिसिंपल्स इतक्या परफेक्ट पणे पाळलेत कि , यांना कोणीच रोखू शकत नाही .


ती प्रिंसीपल्स खालीलप्रमाणे .


(1) Just in Time/zero inventory : 
आजकाल कोणतीच मोठी कंपनी खूप जास्त माल स्टॉक करत नाही , त्यांनी अशी व्यवस्था केलेली असते कि पाहीजे ते मटेरियल "अगदी त्या वेळेत " त्या ठिकाणी पोहचेल .
एखादा स्टॉल टाकून बसू शकले असते पण वेळेवर ग्राहकाच्या हातात देणे ही Just in Time स्ट्रॅटजी आहे .


*************************************


(2)Excellent Customer service : 
इथे यांनी टिश्यू पेपर , छोटी  पाणी बॉटल सुद्धा देऊन एक लेवल पुढे जाऊन कशी सर्वीस दिली जाते? हे दाखवून दिलय ! 


**********************************


(3) Attractive Packaging :


बरेच नवीन व्यावसायिक अती उत्तम प्रॉडक्ट्स बनवतात पण खर्च वाचवण्यासाठी पॅकेजींग सो-सो करतात , 
आजकाल चा ग्राहक कोणतीही पदार्थ तोंडाने खाण्याअगोदर डोळ्याने खातो , आणि मग पुढचा निर्णय घेतो .
***********************************


(4): process delegation


बऱ्याच नवव्यावसायिकांची चुक होते कि, ते एकटेच सगळी ऑपरेशन्स संभाळत बसतात , पण कित्येक बिझनेस हे फक्त टिमवर्क नेच केले जातात , यासाठी written process and delegation याचा वापर करावा लागतो 


* **********************************"*


(5) Ask for Referrals :


कोणताही व्यवसाय ॲड साठी प्रचंड खर्च करतो तेंव्हा कुठेतरी त्याला लोक ओळखायला लागतात , पण हे लक्षात घ्या आजच्या जमान्यात word of mouth सारखं प्रभावी माध्यम नाही त्यामुळेच यांनी पॅकेट वरच अपील केलीये कि , तुम्ही आमची स्टोरी फेसबूक आणि व्हाट्स अपवर शेअर करा ! 


Smart !! 


ही भन्नाट आयडीया आहे ! 
हा पठ्या लवकरच खूप प्रसिद्ध होणार .


चला तर मग आपण पण त्याला थोडं प्रसिद्ध करूया ! शेवटी आपला मराठी पोरगा काहीतरी नवीन बिझनेस मॉडेल डेव्हलप करतोय .


कधी ठाण्यात गेलात आणि यांच्या कर्मचाऱ्याची भेट ट्राफीक मधे झाली तर आवश्य खरेदी करा ! आणि प्रोत्साहन दया ! 


ही स्टोरी होती .
*"Traffic vada pav व गौरव लोंढेची*
Teen Haath Naka flyover ,
Bhakti Mandir ,
Paach Pakdi ,
Thane West 
Maharashtra .या आपल्या
भावाला नक्की व्हायरल करा !


*राजेंद्र मधुकर सावंत*
*निर्माण ग्रुप(चेयरमन)*


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image