राष्ट्रीय कन्या सप्ताहाचा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते शुभारंभ*

*राष्ट्रीय कन्या सप्ताहाचा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते शुभारंभ*


पुणे,दि.२०: "मी गर्भलिंग तपासणी करणार नाही, मी मुलींची भ्रूणहत्या होऊ देणार नाही. मी मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करेन...!" अशी शपथ आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी उपस्थितांना दिली.. निमित्त होते… राष्ट्रीय कन्या सप्ताहाच्या उद्घाटनाचे!


     जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात 'बेटी बचाव बेटी पढाव' योजनेअंतर्गत राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त राष्ट्रीय कन्या सप्ताहाचे उद्घाटन राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. राम यांनी उपस्थितांना "स्त्री भ्रूण हत्या होऊ देणार नाही.." या आशयाची शपथ देवून स्वाक्षरी फलकावर संदेश लिहून स्वाक्षरी केली.


    कार्यक्रमाला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दत्तात्रय मुंडे, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकाश वाघमारे, विस्तार अधिकारी नितीन पवार व सुरेश गुंजाळ तसेच पर्यवेक्षिका व महिला अधिकारी उपस्थित होत्या. 


    राष्ट्रीय कन्या सप्ताहा निमित्त दिनांक २० ते  २६ जानेवारी या सप्ताहात मुलींच्या सक्षमीकरणासाठी विविध शालेय कार्यक्रम, स्पर्धा, जनजागृती सभा, पथनाट्य, कीर्तन, वृक्षारोपण, विशेष ग्रामसभा, गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार, आशा व अंगणवाडी सेविकांच्या गृहभेटी अशा जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री. मुंडे यांनी यावेळी दिली.
000000