कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या सुजाता मनवे तर उपसभापती पदी सेनेच्या भीमाबाई पवार विजयी
कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या सुजाता मनवे तर उपसभापती पदी सेनेच्या भीमाबाई पवार विजयी

कर्जत,दि .30  गणेश पवार

                               कर्जत पंचायत समिती च्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा एकदा वरचष्मा राखला आहे.सभापतीपदी नेरळ गणातून निवडून आलेल्या सदस्या सुजाता मनवे यांनी राष्ट्रवादीच्या सुरेखा हरपुडे यांचा पराभव करून विजय मिळविला. तर उपसभापती म्हणून सेनेच्या सावेळे गणातून निवडून आलेल्या सदस्या भीमाबाई पवार यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या जयवंती हिंदोळा यांचा पराभव करून विजय मिळविला.

                             कर्जत पंचायत समिती च्या सर्वसाधारण असलेल्या सभापती पदासाठी आज 30 डिसेंबर रोजी निवडणूक घेण्यात आली.अध्यासी अधिकारी विक्रम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत सभापती पदासाठी सुजाता मनवे,रविंद्र देशमुख आणि सुरेखा हरपुडे यांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. तसेच उपसभापती पदासाठी भीमाबाई पवार,जयवंती हिंदोळा,सुरेखा हरपुडे आणि कविता ऐनकर यांनी नामांकन अर्ज दाखल केले होते.दुपारी दोन वाजता सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली,त्यात सुरुवातीला दाखल झालेल्या नामांकन अर्जाची छाननी करण्यात आली.त्यानंतर निर्धारित वेळेत सभापती पदाचे उमेदवार रवींद्र देशमुख यांनी आपला नामांकन अर्ज मागे घेतला.तर उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करणारे कविता ऐनकर आणि सुरेखा हरपुडे यांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले.त्यामुळे  सभापती पदासाठी शिवसेनेच्या सुजाता मनवे आणि राष्ट्रवादीच्या सुरेखा हरपुडे यांच्यात निवडणूक झाली असता सभापतीपदासाठी शिवसेनेच्या सुजाता मनवे यांना सात मते मिळवून विजयी झाल्या,तर राष्ट्रवादीच्या सुरेखा हरपुडे यांना पाच मते मिळाली,त्यामुळे अध्यासी अधिकारी विक्रम देशमुख यांनी कर्जत पंचायत समिती च्या सभापतीपदी सुजाता मनवे या विजयी झाल्याचे जाहीर केले.त्यानंतर कर्जत पंचायत समितीच्या उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली.त्यात शिवसेनेच्या भीमाबाई पवार यांना 7 तर शेकापच्या जयवांती हिंदोळा यांना 5 मते मिळाली.त्यामुळे कर्जत पंचायत समिती च्या उपसभापतीपदी भीमाबाई पवार या निवडून आल्याचे अध्यसी अधिकारी देशमुख यांनी जाहीर केले.या निवडणुकीला सदस्य प्रदीप ठाकरे,अमर मिसाळ,नरेश मसणे, कविता ऐनकर,जयवती हिंदोळा, सुरेखा हरपुडे,सुषमा ठाकरे, रवींद्र देशमुख,भीमाबाई पवार, सुजाता मनवे,मावळते उपसभापती काशीनाथ मिरकुटे,मावळते सभापती राहुल विशे आदी सर्व सदस्य हजर होते.अध्यासी अधिकारी देशमुख यांना नायब तहसिलदार संजय भालेराव आणि कर्जत पंचायत समिती चे गटविकास अधिकारी बाळाजी पुरी यांनी सहकार्य केले.

 

फोटो ओळ

छाय ः गणेश पवार