सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावात सुभेदार तानाजी मालुसरे यांचे बालपण गेले.*

*सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावात सुभेदार तानाजी मालुसरे यांचे बालपण गेले.*


*कामगिरी संपादन करा अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.*


*महाराजांनी कोकण स्वारीत संगमेश्वर काबीज करून तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे ठेवले होते. सुर्व्यांनी अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी पळत होते. परंतु तानाजीने अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढून मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले.*


*स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणार्‍या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले.*


*कोंढाण्याची लढाई स्वराज्यासाठी,जिजाबाईंंच्या इच्छेखातर; कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजानी तानाजी मालुसरेला दिली होती. जेव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत होते. त्यांनी ती तयारी अर्धवट सोडली स्वराज्यासाठीचे आपले काम प्राधान्यात घेउन जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले.आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे."हे त्यांंचे शब्दइतिहासात प्रसिद्ध पावले आहेत.*


*गडावर किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता, आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य अष्टमी)[ दुजोरा हवा] रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता किल्ला दिवसा चढणे दिवसा होते. तानजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करून त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्‍न केले. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागुन 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७० रोजी घडली.*


*तिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसर्‍या दिवशी श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे सिंहगडावर पोचले तेंव्हा त्यांना समजले.. महाराज म्हणाले "गड आला पण सिह गेला". अत्यंत दुःखी झालेल्या राजांनी तानाजीचे शव त्यांच्या 'उमरठे' (पोलादपूरजवळ) या गावी पाठवले. ज्या मार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा 'वीरगळ' स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारकसुद्धा उभे केले गेले*


*तानाजी मालुसरेंच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोंढाणा गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले. पुणे शहरातील वाकडेवाडी या भागाचे नाव बदलून ते नरवीर तानाजी वाडी असे करण्यात आले.पुण्याजवळील सिहंगडावर नरवीर तानाजी मालुसरेंचे स्मारक असून, त्यांचा अर्धपुतळा त्या ठिकाणी आहे.*


*रायगड जिल्ह्यातील उमरठे ह्या गावीही त्यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आले आहे.*



*जय जिजाऊ*
       *जय शिवराय*
           *जय शंभूराजे*


*आम्हीच ते शिवशंभु सेवक ज्यांना आस इतिहासाची अन शिव-शंभु कार्याची*


*शिवजयंती हा फक्त उत्सव नसुन तर ऐक प्रकारची आधुनिक चळवळच आहे की जी संपूर्ण शिवशंभु चरित्राचे प्रबोधनाची माहितिच्या स्वरुपात सर्वाना देणे हा आमचा हेतु आहे*


*अखिल शिवाजीनगर गावठान शिवमहोत्सव समिति पुणे*🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩


 


 


 


 


*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*------ 


■★■★★■★◆★◆★◆★ 


 *पुणे प्रवाह न्युज पोर्टल* ......


बातम्या - जाहिरात आणि अधिक माहितीसाठी                    


*संपादक संतोष सागवेकर* 


*मोबाईल नंबर -९५८८६०३०५१*                   


*वर संपर्क साधावा* 



*साप्ताहिक पुणे प्रवाह*


*Youtube _  Facebook*  _ 


 *Instagram Twitter* 


*वर ही*


*आता पुणे प्रवाह*
.................. 


*वरील सर्व पेज लाईक* -



 *सबस्काईब करून*, 
*घंटी चे बटन ही दाबण्यास् विसरू नये,*
*विंनती*
~~~~
 
*पुणे प्रवाह परिवारांशी*
*आपले नातेसंबंध अधिक घट्ट करू या....* 


★★★★      


*सदैव  राहा*
*पुणे प्रवाह परिवारांच्या*
*सोबत अपडेट*
👌👍✌🙏