मराठी भाषा संवर्धन पंधरवडा : पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा :
पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन


पुणे, दि. 10 -    महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयाच्या वतीने  दिनांक 1 ते 15 जानेवारी 2020 या कालावधीमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने आज पुणे येथील मध्यवर्ती इमारतीच्या प्रांगणामध्ये भाषा संचालनालय पुणेच्या विभागीय कार्यालय व शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व  ग्रंथागार,पुणेच्या वतीने पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
           या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्र.विभागीय सहायक, भाषा संचालक महेश लोखंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक राजेंद्र मोरे, तसेच ज्योती विभुते, सविता सोनटक्के,सतिश देशमुख,सहदेव बुरांडे इ.मान्यवर उपस्थित होते.
         या प्रदर्शनामध्ये शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व  ग्रंथागार, पुणे यांच्यामार्फत प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांची सवलतीमध्ये विक्री करण्यात आली. यावेळी मोठया संख्येने वाचकांनी या पुस्तक प्रदर्शनाला भेट देवून पुस्तकांची खरेदी केली.
    0 0 0 0