चकाचक पुणे ..!! हुजुरपागेत स्वच्छता अभियान.. -अश्विनी कदम (नगरसेविका)

चकाचक पुणे ..!!
हुजुरपागेत स्वच्छता अभियान..
-अश्विनी कदम (नगरसेविका)


पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत,' चकाचक पुणे' यानिमित्ताने आज स्वच्छता साखळी अभियानाचे विविध शाळांमधून विद्यार्थ्यांन मार्फत जनजागृतीचे अभियान राबविले गेले, त्याप्रसंगी हुजूरपागा शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम प्रतिसाद देऊन स्वच्छता साखळीचा उपक्रम प्रशाले ने राबविला त्याप्रसंगी मला निमंत्रित करण्यात आले होते. प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय गालिंदे मॅडम,माननीय वसुधा कुलकर्णी मॅडम सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचा सहभाग उत्तम होता. 
  आदरणीय खासदार Adv. वंदनाताई चव्हाण यांनी सुरू केलेल्या 'चकाचक पुणे' या उपक्रमाची ही बाजू अतिशय उत्तम पणे संभाळता आली. विद्यार्थ्यांना यासंदर्भात मार्गदर्शन करून ,आपल्या शहरा प्रती स्वच्छतेचे आपले कर्तव्य काय आहे याची आवश्यकता व महत्व समजावून दिले. 😊🙏🏻