महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचालित तीनही* *विद्यालयांच्या चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल १०० टक्के

#PRESSNOTE


*महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचालित तीनही*
*विद्यालयांच्या चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल १०० टक्के*


पुणे : महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचलित टिळक रस्त्यावरील सि. धों. आबनावे कला महाविद्यालय, अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि कोंढवा येथील कै. जडावबाई दुगड माध्यमिक विद्यालय या तीनही विद्यालयाच्या चित्रकला ग्रेड परिक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य कला संचनालय, मुंबई च्या वतीने २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय 'एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट' या ग्रेड परीक्षांचा निकाल सलग तिसऱ्या वर्षी १०० % लागला असून, ८० टक्के विद्यार्थ्यांना 'अ' श्रेणी मिळाली आहे.


महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळालेल्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ. विकास आबनावे यांनी कलाशिक्षिका रुपाली राऊत, कल्याणी साळुंखे, पायल क्षिरसागर, कलाशिक्षक भागुजी शिखरे आणि प्रभारी मुख्याध्यापिका विद्या कांबळे, मुख्याध्यापिका सुनीता ननावरे यांचे अभिनंदन केले. यावेळी संस्थेचे संचालक प्रसाद आबनावे, प्रथमेश आबनावे, प्रज्योत आबनावे उपस्थित होते.