रोटरीचे “जय हो”अधिवेशन दिनांक ४ व ५ जानेवारी रोजी पुण्यात संपन्न होत आहे.

रोटरीचे “जय हो”अधिवेशन दिनांक ४ व ५ जानेवारी रोजी पुण्यात संपन्न होत आहे.या संबंधी माहिती देतांना प्रांतपाल रवी धोत्रे म्हणाले की या अधिवेशनास पुणे व रायगड जिल्ह्यातून १२०० ते १५०० रोटरी सदस्य हजर राहणार असून प्रमुख पाहुणे २०१६ च्या सर्जिकल स्ट्राईक मधील परम विशिष्ट सेवा पदक विजेते माजी लेफ्ट.जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्या हस्ते उद्घाटन होईल.जवानांच्या शौर्य कथा सामान्यांपर्यन्त पोहोचविणा-या “लक्ष्य फौंडेशन”च्या अनुराधा प्रभूदेसाई यांनाही याप्रसंगी खास आमंत्रित केले आहे.तसेच लोकबिरादरीचे संस्थापक मॅगसेसे पुरस्कार विजेते पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे,गोवर्धन इको व्हिलेजचे संचालक आय.आय.टी.पदवीधारक असून आध्यात्मिक गुरु झालेले गौरांग दास यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे.हिन्दी – मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटविणारा मराठी कलाकार श्रेयष तळपदे व स्वत: दृष्ट्री गमविल्यानंतरही डोळसांना जगण्याची नवीन दृष्ट्री देणारी अनघा मोडक हे युवा पिढीसाठी खास आकर्षण असतील.


रोटरी ३१३१ प्रांताचे सचिव नामदेव कुरे यांनी संगितले की भारतीय रोटरीला १०० वर्ष पूर्ण होत असल्याने काही महत्वाकांक्षी समाजोपयोगी प्रकल्प यंदा घेण्यात येणार आहेत आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवा व गरीब महिलांना स्वावलंबी उदरनिर्वाहासाठी २००० दुभत्या गाईंचे वाटप करण्यात येणार आहे.या प्रकल्पात ५०० गाईंचे वाटप झाले आहे.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या “आयुष्यमान भारत” योजने अंतर्गत पुण्यातील एका दवाखान्यास रु ८ कोटींची अद्ययावत उपकरणे देवून गरजूंच्या विनामुल्य उपचारासाठी “रोटरी हॉस्पिटल” उभारण्याची योजना आहे.पुण्यापासून जवळील खेड्यापाड्यातील दुर्लक्षित शाळांना योग्य ती मदत करून शहरातील शाळांसारखा दर्जा देण्यासाठी “हॅप्पी स्कूल”प्रकल्पासाठी १० कोटीची तरतूद करण्यात आली आहे. प्रांतपाल रवी धोत्रे पुढे म्हणाले की हे अधिवेशन संपूर्णपणे ईको फ्रेंडली असणार आहे रोटरीचा “सेव्ह प्लानेट अर्थ” प्रकल्पा अंतर्गत “रेन वॉटर हार्वस्टिंग,Sanitary Pads Disposal,”से नो टू प्लॅस्टिक”असे विविध उपक्रम १३६रोटरी क्लब मधील ५४०० सभासद पुणे-रायगड जिल्ह्यात सतत करत असतात.यामध्ये पुण्यातील बरेच कॉर्पोरेट व एनजीओ सहभागी असतात.यामध्ये सर्व रोटरी मिंत्रांचा अधिवेशनात सत्कार करण्यात येणार आहे.याद्वारे समाजातील सर्व घटकांमध्ये विश्वबंधुत्वाची जाण निर्माण करण्याचे महत्वाचे काम रोटरी करत असते.अशा समाजोपयोगी कामांचा आढावा घेवून नवीन वर्षात अधिक जोमाने वाटचाल करण्यासाठी हे अधिवेशन खूप उपयुक्त ठरेल.