*19 फेब्रुवारी 2020 शिवजयंती उत्सव- माहिती - सफर छत्रपती शिवशंभु निर्मित सह्याद्रीच्या गडकोट, किल्ले या संदर्भात*

*19 फेब्रुवारी 2020 शिवजयंती उत्सव- माहिती - सफर छत्रपती शिवशंभु निर्मित सह्याद्रीच्या गडकोट, किल्ले या संदर्भात*


🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻


*शिवजयंती मना-मनात...*
*शिवजयंती घरा-घरात....*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


*आज किल्ले-सुवर्णदुर्ग या बाबत माहिती*


हर्णे बंदर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनाऱ्यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवागड.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे


दुर्गाचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून उत्तराभिमुख आहे. हे प्रशस्त प्रवेशद्वार शिवाजी महाराजांनी बांधून घेतले आहे असे म्हणतात. उजव्या बाजूला तटबंदीवर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. प्रवेशद्वारातून आत शिरताच पहारेकर्‍यांच्या दोन देवड्या दिसतात. या देवड्यांच्या दोन्ही बाजूने तटबंदीवर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत.किल्ल्यात दक्षिणेकडे भक्कम बांधणीचे एक कोठार आहेबांधीव विहीर आणि पुढे राजवाड्याचे दगडी चौथरे आहेत.


दुर्गाच्या पश्चिम तटाकडे एक सुरेख चोरदरवाजा आजही सुस्थितीत असलेला दिसतो. गडावर सात विहिरी आहेत, पण कुठेही मंदिर नाही. प्रसिद्ध दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांची कुलदेवता कालंबिका देवी हिचे इथले देऊळ कान्होजीने केव्हातरी सुवर्णदुर्गावरून हलवून देवीची स्थापना अलिबागच्या हिराकोटामध्ये केली होती.
गडावर जाण्याच्या वाटा


मुंबई गोवा महामार्गावर असणार्‍या खेड फाट्यावरून दापोली आणि पुढे दापोलीहून बसने हर्णेला जाण्यासाठी बससेवा आहे. हर्णे बस स्थानकावरून साधारण १०-१५ मिनिटांत पायी हर्णे बंदर गाठता येते.


हर्णे बंदरावरून किल्ल्यात जाण्यासाठी स्थानिक मच्छीमार संघटनेने छोटे पडाव ठेवले आहेत. होडीतून सुवर्णदुर्गावर जाण्यासाठी साधारण २० मिनिटे लागतात.


*जय जिजाऊ*
             *जय शिवराय*
                     *जय शंभूराजे*


*आम्हीच ते शिवशंभु सेवक ज्यांना आस इतिहासाची अन शिव-शंभु कार्याची*


*शिवजयंती हा फक्त उत्सव नसुन तर ऐक प्रकारची आधुनिक चळवळच आहे की जी संपूर्ण शिवशंभु चरित्राचे प्रबोधनाची माहितिच्या स्वरुपात सर्वाना देणे हा आमचा हेतु आहे*


*अखिल शिवाजीनगर गावठान शिवमहोत्सव समिति पुणे*🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩