13व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी(क्रीडा) अजिंक्यपद स्पर्धेत  बीएसएफच्या एस.के घोषला सुवर्णपदक

13व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी(क्रीडा) अजिंक्यपद स्पर्धेत  बीएसएफच्या एस.के घोषला सुवर्णपदक
संघिक गटात एसएसबी संघाला सुवर्ण पदक 
पिंपरी चिंचवड, 13 जानेवारी: महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीने 13व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी(क्रीडा)स्पर्धेत पुरूषांच्या .22  50 मिटर फ्री पिस्टल गटात बीएसएफच्या एस.के घोषने 550.0, 10xगुणांसह सुवर्णपदक पटकावले. 


श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत  एस.के घोषने 550.0, 10x गुणांसह सुवर्णपदक पटकावले. एसएसबीच्या गौरव दागरने 550.0, 8x गुणासह रौप्य तर एसएसबीच्याच विक्रम शिंदेने 550.0, 7x गुणासह कांस्य पदक पटकावले. 


सांघिक गटात एसएसबी संघाने 1649.0 गुणासह सुवर्ण पदक पटकावले. यात गौरव डागरने 550.0, विक्रम शिंदेने 550.0 तर प्रविण कुमारने 549.0 गुण मिळवून देत संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. बीएसएफ संघाने 1616.0 गुणा घेत रौप्य पदक पटकावले. यात एस.के घोषने 550.0, रुपक मलिकने 535.0 तर विवेक चौधरीने 531.0 गुण मिळवले. सीआरपी संघाने 1588.0 गुण मिळवत कांस्य पदकाला गवसणी घातली. यात धिरेंद्र कुमार सिंगने 537.0, तुषार सिंगने 528.0 तर गौरव कुमार सिंगने 523.0 गुण मिळवले. 


स्पर्धेचे पदक वितरण भारताची आंतरराष्ट्रीय  नेमबाज (काॅमनवेल्थ गेम पदक विजेती) अर्जुन पुरस्कार प्राप्त हिना सिध्दु यांच्या हस्ते तसेच श्री संदीप बिष्णोई ,पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या हस्ते करण्यात आले. 


स्पर्धेचा सविस्तर निकाल- पुरूष-50 मिटर फ्री पिस्टल- 
1. एस.के घोष(बीएसएफ)(550.0, 10X) , 2. गौरव दागर (एसएसबी)(550.0, 8X), 3.विक्रम शिंदे(एसएसबी)(550.0, 7X)


पुरूष- सांघिक गट-
1. एसएसबी- 1649.0-(गौरव डागर 550.0, विक्रम शिंदे 550.0, प्रविण कुमार 549.0)
2. बीएसएफ- 1616.0(एस.के घोष 550.0, रुपक मलिक 535.0, विवेक चौधरी 531.0)
3. सीआरपी- 1588.0(धिरेंद्र कुमार 537,तुषारसिंग 528,गौरवकुमारसिंग 523)