दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी  राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या जयंती निमित्त जन्मोत्सव  सोहळ्याचे  दि. 12 जानेवारी 2020 रोजी बुलढाणा जिल्हय़ातील  सिंदखेडराजा

मराठा  सेवा संघ आणि ३२ कक्ष यांच्या  विद्यमाने  दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी  राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या जयंती निमित्त जन्मोत्सव  सोहळ्याचे  दि. 12 जानेवारी 2020 रोजी बुलढाणा जिल्हय़ातील  सिंदखेडराजा येथे आयोजन  करण्यात आले. 


स्वराज्याची प्रेरणा देणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री यांच्या जयंतीचे औचित्य  साधून दरवर्षी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड ,  जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 12  जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात राजघराण्यातील मान्यवरांच्या  हस्ते  जिजाऊ पुजन  करून  सोहळ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर  राजवाडा ते जिजाऊ  सृष्टी असा भव्य पालखी  सोहळा आयोजित करण्यात आला आहे. जिजाऊ  सृष्टीवर स्वराज्याच्या भगव्या ध्वजाचे  रोहण  करून महाराष्ट्रातील  नामवंत शाहिरांचा  पोवाड्याचा कार्यक्रम , पुस्तक प्रकाशन, सांस्कृतिक कार्यक्रम , नवोदित वक्त्यांची भाषणे होणार  आहेत.  त्यानंतर दुपारी दोन वाजता शिवधर्म पिठावर  मुख्य  सोहळ्याला सुरुवात  होईल. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर साहेब यांचे प्रमुख भाषण होणार आहे.
या सोहळ्यासाठी सर्व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे


जय जिजाऊ ⚔ जय शिवराय


#दत्ता_पाटील
#संभाजी_ब्रिगेड_औराद_बा_कर्नाटक_राज्य