अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ कार्यकारिणीची सभा आज 11जानेवारी 2020 रोजी पुणे येथे पार पडली.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ कार्यकारिणीची सभा आज 11जानेवारी 2020 रोजी पुणे येथे पार पडली.
संस्थेची नवीन घटना लागु झालेली असून त्यानुसार द्वितीय उपाध्यक्ष म्हणून श्री. विजय खोचिकर ,द्वितीय सहकार्यवाह म्हणून चैत्राली डोंगरे ,द्वितीय सहकार्यवाह म्हणून निकिता मोघे यांची निवड करण्यात आली.
याचवेळी स्वीकृत सदस्य (संचालक)म्हणून कोल्हापूरचे रवी गावडे व मुंबईचे रत्नाकांत जगताप यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ,उपमुख्यमंत्री श्री .अजित पवार,सांस्कृतिक मंत्री श्री.अमित देशमुख,सांस्कृतिक राज्यमंत्री श्री.राजेंद्र येड्रवकर पुण्याचे नूतन महापौर श्री.मुरलीधर मोहोळ श्री.जब्बार पटेल नूतन नाट्य संमेलन अध्यक्ष यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.यावेळी अखिल  भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.