मुक्ताचा निबंध* 💐 मान्यवरहो ,थोर विचारवंतांनी ' मुक्ताचा निबंध ' म्हणजे शोशितांच्या साहित्याचे पहिले अन मर्मभेदी पान मानले आहे . 👉 साहित्याबद्दल अण्णाभाऊ म्हणतात की

💐 *मुक्ताचा निबंध* 💐


मान्यवरहो ,थोर विचारवंतांनी ' मुक्ताचा निबंध '
म्हणजे शोशितांच्या साहित्याचे पहिले अन मर्मभेदी पान मानले आहे .


👉 साहित्याबद्दल अण्णाभाऊ म्हणतात की ,


" *जगातील सर्व श्रेष्ठ कलावंतानी वाड:मय हा जगाचा तिसरा डोळा मानला आहे .आणि तो सदैव पुढे व जनते बरोबर असणे जरूरी आहे* ." ...  


खरोखरीच मुक्ताचा वाङ्मय रुपी निबंध म्हणजे दलित साहित्याचे पहिले पान तर आहेच शिवाय संबद्धीत सोशीत जगाचा तिसरा डोळा सुद्धा आहे.  


*यातील बोध, निरीक्षण ,वेदना ,नकार , विद्रोह आणि आशावाद समजून घेऊया*.....


 आणि अण्णाभाऊ म्हणतात त्याप्रमाणे तो सदैव आपल्या समोर ठेवूया    ----    मा धो खिलारे
---------------------------------------------------------


१ मे १८५५  रोजी ' ज्ञानोदय ' नावाच्या  पाक्शिका मधे प्रकाशित झालेला,सावित्रीआई फुले यांच्या शाळेतील विध्यार्थीनी व वंदनिय लहूजी साळवे यांची पुतनी कु .मुक्ता येसाजी साळवे हीने केवळ बाराव्या वर्षी तिसरीत शिकत असताना लिहिलेला एक निबंध...     -                             -अर्थात -
ऐतिहासिकदृष्ट्या सोशितांच्या अक्षरसाहित्याचे पहिले ठरलेले पान.
----------------------------------------------------


 💐  *विषय : मांग-महारांच्या दुःखाविषयी*  💐


             - लेखिका -कु . मुक्ता येसाजी साळवे
                ( -जन्म दिनांक ५ जानेवारी १८४३ )


      ईश्वराने मज दिनदुबळीच्या अंतःकरणात आम्हा ,दुर्दैवी, पशुपेक्षाही नीच मानलेल्या , दरिद्री मांगमहारांच्या दुखाविषयी भरविले,त्याच जगतकर्त्याचे मनात चिंतन करून,हया निबंधांविषयी मी आपल्या शक्तिप्रमाणे हा निबंध लिहिण्याचे काम हाती सरसावून घेतले आहे.
परंतु बुद्धिदाता व निबंधास फळदेता,
मांग-महारास व ब्राह्मणासही उत्पन्नकर्ता जगन्नाथच  आहे.


" महाराज,आता जर वेदाधारे करून आमचा द्वेष करणारे ( ब्राम्हण  ) लोक,
ह्यांच्या मतांचे खंडन करावे तर हे आम्हा पेक्षा उंच म्हणवणारे, विशेष करून लाडू खाऊ ब्राम्हण लोक हे असे म्हणतात की,


' *वेद तर आमचीच मत्ता आहे, आम्हीच याचे अवलोकन करावे* '
तर यावरून उघड दिसते की
👉 *आम्हास धर्मपुस्तक नाही.*
जर वेद ब्राम्हनासाठि आहेत,तर मग  ,
👉वेदांप्रमाणे वर्तणुक  करने हा ब्राम्हणाचा धर्म होय.👈
जर आम्हास धर्मासम्बन्धी पुस्तक  पहाण्याची मोकळीकच नाही,
तर 
👉 *आम्ही धर्मरहित आहोत असे साफ दिसते की नाही बरे* ?👈


👉 हर हर !  असे जे वेद , की ज्यांचे


ब्राम्हणाच्या मताप्रमाणे अवलोकन केल्याने  महापातक घडते,


👉तर मग त्यांच्या आधारे आचरण केल्याने आम्हास किती दोष येईल बरे  ?


👉मुसलमान लोक कुराणाच्या अधारेकरून ,
इंग्रज लोक बायबल आणि ब्राम्हण लोक वेदांधारेकरून चालतात. म्हणूनच ते आपआपल्या खऱ्याखोट्या धर्माप्रमाणे जास्त कमी पण आम्हापेक्षा सुखी आहेत असे वाटते. 


तर हे भगवान !
👉   *तुजकडून आलेला कोणता धर्म तो आम्हास कळीव*.
म्हणजे आम्ही सर्व त्यांच्या रितीने अनुभव घेऊ !  👈


*परंतु ज्या धर्माचा एकानेच अनुभव घ्यावा व  बाकीच्यानी त्या  खादाड मनुष्याच्या तोंडाकडे पहावे,तो ( खादाड मनुष्याचा ) व त्यासारखे दूसरे धर्म पृथ्वीवरून नष्ट होवोत* व


👉 अशा धर्माचा  अभिमान करावा असे आमच्या मनात देखील न  येवो !


आम्हा मांग  महारास हाकलून देऊन आपण मोठ मोठाल्या इमारती बांधून हे लोक बसले,
👉 व त्या इमारतीच्या पायात आम्हांस तेल व शेंदूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वंश करण्याचा उपक्रम यानी चालविला होता.
आम्हा मनुष्यास ब्राम्हण लोकानी गायीं,म्हशीपेक्षा नीच मानले आहे 
सांगते ऐका,
👉 ज्या वेळी बाजीरावाचे राज्य होते ,त्यावेळी आम्हास (निदान)
गाढवाप्रमाणे तरी मानीत होते काय  ? ( नाही ! )
पहा बरे तुम्ही,
एखाद्या लंगड्या गाढवास  मारा बरे , त्याचा धनी तुमची फटफजिती  करून तरी गप  राहील की काय ? नाहीना ? 
परंतु मांग - महारास मारू नका असे म्हणणारा कोण (धनी ) होता  बरे ?
त्या समयी मांग अथवा महार  यातून कोणीही  तालीमखान्या पुढुन गेला असता ,गुलटेकडी च्या मैदानात त्याच्या 
👉 शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून
(क्रूर खेळ ) खेळत होते.
अशी जर मोठ्या सोवळ्या राजाच्या दारावरून जाण्यास बंदी होती तर मग,


👉विद्या शिकण्याची मोकळीक कुठून मिळणार ?


कदाचित कोणास वाचता आलेच व ते बाजीरावास कळले तर तो म्हणे की,
" हे महार मांग असून वाचतात, तर  ब्राम्हनानी का त्यांच्या दप्तराचे काम याना देऊन, त्याऐवजी धोकट्या मारून विधवाच्या हजामती करीत फिरावे की काय ? "
👉असे बोलून तो त्यास शिक्षा करी. दूसरे असे की,
👉नुसती लिहिण्याचीच बंदी करून हे लोक थाम्बले की काय ?
नाही !
बाजीरावसाहेब तर काशीस जाऊन धुळींत रहिवासी होऊन तदरूप झाले ,पण त्यांच्या सहवासाच्या गुणांनी येथील महार तो काय ? 
पण तो ही मांगाच्या सावलीचा स्पर्श होऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहे.


सोवळेे नेसून नाचत फिरणार्या लोकांचा एवढाच हेतु की,


👉' काही लोकांपेक्षा आम्ही पवित्र आहो ' असे मानने. 
बरे त्यापासून त्यास सुख वाटते.
पण...पण 
एका शिवण्याच्या बंदीपासून आम्हांवर किती दुःखे पडतात  ह्यांचा हया निर्दयांच्या अंत:करणास द्रव येतो की काय  ?
ह्याच कारणामुळे आम्हांस कुणी चाकरीस ठेवित नाहीत.
👉  *जर चाकरी मिळण्याची एवढी बंदी तर आम्हास पैसा कोठून मिळणार* ?
हे उघड उघडच सिद्ध होते की, आमचे  हाल फार होतात.


👉पंडित हो !  तुमचे स्वार्थी अप्पलपोटी पांडित्य 
पूजेसहित एकीकडे गुंडाळून ठेवा,
आणि मी सांगते ह्याजकडे लक्षपूर्वक कान द्या.


👉 *ज्यावेळी आमच्यातल्या स्त्रिया बाळंत होतात, त्यावेळेस त्यांच्या घरावर छप्परसूद्धा नसते*.


👉 पाऊस व वारा ह्यांच्या उपद्रवामुळे त्यास 
किती दुःख होत असेल बरे ह्याचा विचार स्वतः च्या अनुभवावरून करा.


👉जर एखाद्या वेळेस त्यास बाळंतरोग झाला तर ,त्यास अौषधास व वैद्यास पैसा कोठून मिळणार ?
असा कोणता तुम्हामध्ये सम्भावीत वैद्य होता की,
👉त्यानी फुकट अौषध दिलीत ?


👉मांग महाराच्या मुलांस  ब्राम्हणादिकांच्या मुलांनी
दगड मारून रक्त निघाले तरीसूद्धा  ते सरकारात जात नाहीत.ते म्हणतात की,
' आपणास उचिस्ट  (उष्टी  ) आणावयास अनुक्रमाने ( दररोज त्यांच्यापुढेच ) पुढे जावे लागते,'
असे म्हणून उगीच ( गप्प ) रहातात.


हाय हाय ! काय रे भगवान ! 
हे दुःख, हे जुलुम विस्ताराने लिहू लागले तर मला रडू येते.!


*या कारणाने भगवंतांनी आम्हांवर कृपा करून दयाळू इंग्रज सरकारास येथे पाठवले* .


आणि आता या राज्यातून आमची जी दु:खे  निवारण झाली ती अनुक्रमाने पुढे लिहिते. ---


👉  शुरपणा दाखवणारे व गृहात उंदीरही न मारणारे असे जे, गोखले, आपटे, त्रीम्बकजी , आंधळा,पानसरे, काळे, बेहेरें  इत्यादि 
👉हे निरर्थक मांग महारावर 
स्वार्या घालून ( आपल्या पापाच्या ) विहिरी भरत होते  व
👉 गरोदर बायकांसही देहांत शासने करीत होते  *ते बंद झाले*


आणि पुणे प्रांती मांग- महाराचे  कल्याण ?  करणारे दयाळू बाजीराव महाराजाच्या राज्यात अशी अंधाधुंदी होती की,
*ज्यांच्या मनास वाटेल त्याने मांग महारावर नाना प्रकारची तूफाने घेऊन शेंदाड शिपायांसारखा जुलुम करीत होते* .


👉ते बंद झाले.


👉 *किल्ल्याच्या  पायात घालण्याची प्रथा बंद झाली.*
आमचा वंशही वाढत चालला.
👉मांग महार यातून 
कोणी बारीक (भारी ) पांघरूण (शाल इत्यादी )पांघरले असता ते म्हणत की ,
" यानी चोरीच करून आणले, हे पांघरूण तर फक्त  ब्रम्हनानीच पांघरावे मांग महार जर  पांघरतील तर धर्म भ्रष्ट होईल. "
असे म्हणून ते त्यांस बांधून मारीत.
पण..आता
👉 इंग्रजांच्या राज्यात ज्यास पैसा मिळेल त्याने घ्यावे (असे आहे ).


👉 *उंच वर्णातील लोकांचा अपराध केला असता मांगाचे किंवा महाराचे डोके मारीत होते, ती प्रथा बंद झाली.*


👉जुलमी बिगार बंद झाली.


👉  *अंगाचा स्पर्श होऊ देण्याची मोकळीक कोठे कोठे ( काही ठिकाणी ) झाली.*


👉  *गुलटेकडीच्या मैदानात (क्रूर )चेंडू नि दांडू खेळण्याची बंदी झाली.*


👉बाजारात फिरण्याची मोकळीक झाली.


आता निपक्षपाती दयाळू इंग्रज सरकारचे राज्य झाल्या पासून----
एक चमत्कारीक गोष्ट झाली आहे ती लिहिताना मला मोठे आश्चर्य वाटते, 
👉ती अशी की ,जे ब्राम्हण  पूर्वी आम्हांस वर सांगितल्या प्रमाणे दुःख देत होते,
👉 तेच आता माझे स्वदेशीय प्रिय,मित्र बंधु आम्हांस या दू:खातून बाहेर काढण्याविषयी रात्रंदिवस सतत मेहनत घेतात,
परंतु ,
सर्वच ब्राम्हण घेतात असे नाही.
त्यातून ज्यांचा विचार 😼सैतानाने नेला आहे ,
ते पूर्वीसारखेच आमचा द्वेष करितात. आणि जे माझे प्रिय बंधु आम्हांस बाहेर काढण्याविषयी प्रयत्न करतात .त्यांस म्हणतात की,
😼" तुम्हांस जाती बाहेर टाकू "


👉 *आमच्या प्रिय बंधूनी मांगमहाराच्या मुलांच्या शाळा मांडल्या आहेत.*
👉 *या शाळांना दयाळू इंग्रज सरकारही मदत करतात.*
👉म्हणून मांडलेल्या शाळांना फारच सहाय्य आहे.


दारिद्रय़ाने व दुःखाने  पिडलेल्या 👉मांगमहार लोकहो,


👉 *तुम्ही रोगी आहात, तर तुमच्या बुद्धिला ज्ञानरूपी अौषध घ्या.*


*म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन, तुमच्या मनातील कूकल्पना जाऊन* 🙏 *तुम्ही नीतिमान व्हाल तर*,


👉 *तुमच्या रात्रंदिवस ज्या जनावरांप्रमाणे ज्या हाजर्या घेतात त्याही  बंद होतील* .
👉   *तर आता झटुन अभ्यास करा*  !
🙏 *म्हणजे तुम्ही ज्ञानी होऊन कूकल्पना करणार नाहीत*.
परंतु हे ही माझ्याने सिद्ध करवत नाही...यास उदाहरण ---


जे शुद्ध शाळेत शिकलेले,पटाईत, सुधारलेले म्हणवितात 
तेही एखाद वेळेस रोमांच उभे रहाण्याजोगे वाईट कर्म करितात
मग तुम्ही तर मांगमहारच आहात !


---------------------------------------------
                   --  निबंध समाप्त--


संदर्भ : *पुणे शहराचे वर्णन*  
लेखक :श्री ना.वी.जोशी.आवृत्ती सन १९०२       
लेख लिपि लेखन : मा धो.खिलारे..सहायक अभियंता ,नाशिक. मो नं 7030544660
                              🙏  
कृपा करून मराठी दलित साहित्याचे हे पहिले पान अर्थात ,सुवर्ण पुष्प 💐सगळीकडे जाऊ दया.
त्याचा मुल्ल्यसिद्ध  सुगंध दरवळूदया. एक सत्यशोधकी क्रांतीनाद घुमू दया .


हा निबंध म्हणजे त्यावेळच्या ब्रिटिश सरकारकडे मुक्ताने केलेले आर्जवी निवेदन आहे . *महाराज*  हे संबोधन सरकासाठीच आहे .त्यावेळच्या सरकारी ग्याझेट मध्ये आजही हा निबंध उपलब्ध आहे .
-----------:-------------
टीप : वरील निबंधातिल कंसातले शब्द व चिन्हे मूळची नाहीत .
वाचकाना निबंध मर्म कळावे म्हणून ,आम्ही ती अंतर्भूत केलीत . क्षमस्व  ! धन्यवाद !


🙏🙏🙏🙏