लिंबाचे अनेक उपयोग आहेत. याचे सरबत, लोणचे इत्यादी करतात. लिंबू हे फळ आहे.

*लिंबू*


कागदी लिंबू हे भारतीयांच्या अन्‍नात रोजच्या वापरात असलेले एक आंबट चवीचे फळ आहे. हे फळ कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळ्या रंगाचे होते. लिंबाचे ईडलिंबू आणि कागदी लिंबू असे दोन मुख्य प्रकार आहेत. कागदी लिंबाचे अनेक उपयोग आहेत. याचे सरबत, लोणचे इत्यादी करतात. लिंबू हे फळ आहे.
लिंबाच्या झाडाला लिंब किंवा निंब म्हणतात. हे झुडुप असते. पान जेथे देठाला चिकटते, तेथे एक लहानसा पंख असतो. देठाला लहान काटे असतात. पानाच्या बेचक्यात फूल आणि फळ येते. लिंबाचे सालीवरून अनेक प्रकार होतात, ते असे. जाड साल, पातळ साल, पिवळी साल, हिरवी साल, सपक साल आणि खरखरीत साल. बगदाद येथे दुप्पट आकाराची आणि तांबूस फळे देणारा एक प्रकार आहे. सिसिली बेटात लिंबाचे अमाप पीक येते अमेरिका आणि इंग्लंड या देशांत सिसिलीची लिंबे जातात.


*लिंबाच्या अनेक जाती आहेत, महाळुंग, ईडलिंबू, जंबीर, कागदी लिंबू, वगैरे.*


*लिंबू सेवनाचे फायदे.*


१. लठ्ठपणा कमी करण्यासाठी :- दररोज सकाळी उपाशी पोटी गरम पाण्याबरोबर लिंबू सेवन केल्यास अतिरिक्त चरबी कमी होते.


२. पित्त झाल्यास रोज लिंबाचे सरबत घेतल्यास भूक वाढते. अन्न पचते व शौचास साफ होते.


३.वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते. अंगाला कंड सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगास चोळतात. व गरम पाण्याने स्नान करतात. कंड कमी होते..


४.नायटे व डोक्यातील खवडे यावरही लिंबाचा रस चोळल्याने चांगला परिणाम होतो.


५. सुंदर केसांसाठी लिंबू :


जर डोक्यावरचे केस किंवा टाळूवरची त्वचा तेलकट असेल तर त्यावर लिंबू लावतात. जास्त प्रमाणात लावल्यास केस ब्लीच होतात.. मात्र थोडासा लिंबाचा रस हाताने केसांच्या मुळास लावणे योग्य असेल. रोजचा किंवा सतत लिंबाचा उपयोग केसांवर म करता फक्त गरजेनुसार करतात. मरगळलेल्या केसांना लिंबाचा रस चमक आणि तजेलदार बनवतात. कृत्रिम उत्पादनांचा वापर न करता केस सुंदर आणि सुगंधी होतात. गरमीच्या दिवसात घामाने आणि धुळीने केस मळतात, त्यामुळे लोक केस वारंवार धुतात. लिंबाचा योग्य प्रमाणातला वापर केसांना चमकदार व गुळगुळीत बनवतो. अतिवापराने केस कोरडे होऊ शकतात.


Popular posts
मा.उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी आपले शासकीय वाहन जमा करून खाजगी वाहनाने प्रवास केला.
Image
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा पदवीप्रदान समारंभ गुरुवार ३ सप्टेंबर, २०२० रोजी 
Image
जगजौत्या सिंकदर ला ही ज्याप्रमाणे भारता मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले ,त्याप्रमाणे कोरोना ही पराभूत होणार....
Image
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११७ व्या पदवीप्रदान समारंभासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात अर्जाचा नमुना, शुल्क इत्याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या convocation.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान