मठाधिपती ज्ञानब्रह्मऋषी पूजनीय विश्वेशतीर्थ स्वामीजी यांना एमआयटी विश्वशांती विद्यापीठ व विश्वशांती केंद्र (आळंदी)च्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली

 


एक महान साधक व तत्वचिंतक, वैश्विक भारतीय संस्कृतीचे मूर्तिमंत प्रतीक असलेले पेजावर मठाधिपती ज्ञानब्रह्मऋषी पूजनीय विश्वेशतीर्थ स्वामीजी यांना एमआयटी विश्वशांती विद्यापीठ व विश्वशांती केंद्र (आळंदी)च्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली


पुणे, दि. 29 डिसेंबर : एक महान साधक, तत्वचिंतक, एक आदरणीय सतशील यतिस्वरूप व महान विभूती आणि भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक असलेले ज्ञानब्रह्मऋशी पूजनीय विश्वेशतीर्थ स्वामीजी यांचे आज पेजावर मठ, कर्नाटक येथे निधन झाले, त्याबद्दल एमआयटी विश्व शांती विद्यापीठाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि समस्त विद्यार्थ्यांतर्फे भावपूर्ण श्रध्दांजली.
डॉ. विश्वनाथ कराड यांनी स्वामी विश्वेशतीर्थांच्या अत्यंत दुःखद अशा देहावसानाविषयी बोलताना सांगितले की, पूजनीय विश्वेशतीर्थ स्वामीजी आणि एमआयटी शिक्षण संस्था समूहाचा अतिशय जुना ऋणानुबंध होता. नुकतीच 2018 साली झालेली विज्ञान, अध्यात्म आणि वैश्विक तत्त्वज्ञान या विषयावर झालेली जागतिक तत्त्वज्ञान परिषदेत 'सर्व धर्मग्रंथ हे खर्‍या अर्थाने जीवनग्रंथ आहेत' या महत्वपूर्ण परिसंवाद बोलताना, विश्वेशतीर्थ स्वामीजी यांनी भारतीय संस्कृतीच्या 'वसुधैव कुटुंबकम' या अत्यंत महत्वपूर्ण अशा वैश्विक तत्त्वज्ञानविषयी बोलताना म्हणाले होते की, ' विश्वशांती व मानवी कल्याणाचा संदेश देणारे हिंदूंचे 'पुराण' आणि मुस्लिमांचे 'कुराण' यांचा आज खर्‍या अर्थाने समन्वय व संयोग या जगातील सर्वात मोठ्या तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या घुमटाकार वास्तूतून प्रतित होत आहे.'
त्याचबरोबर, गेल्या महिन्यात विश्वराजबाग येथे संपूर्ण जगातील पहिले विश्वरूप दर्शन देवता मानवता मंदिर चा प्राण प्रतिष्ठापना सोहळा मा. विश्वेशतीर्थ स्वामीजींच्या शुभहस्ते संपन्न झाला आणि ते स्वतः आजारी असतानाही, त्यांनी स्वयंप्रेरणेने परत एकदा विश्वराजबाग येथील विश्वरूप दर्शन देवता मानवता मंदिरात येऊन, स्वतः विधिवत, मनोभावे, प्रसन्न चित्ताने व संपूर्ण देहभान विसरून  दिवसभर पूजा केली होती व सर्वांना आशीर्वादही दिला. त्यानंतर आळंदीच्या इंद्रायणी तीरावरील, संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच्या साक्षीने, विश्वरूप दर्शन मंचावरून, लाखो वारकरी भाविक भक्तांना अत्यंत अंतःकरणापूर्वक असे आशीर्वाद देऊन, त्यांना विष्णुमय स्वरूपातील वारकरी सांप्रदाय हा संपूर्ण जगाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखविला, अशा स्वरूपाचा एक महान वैश्विक संदेश दिला होता.
आपल्या भारत देशातीलच नव्हे तर संपूर्ण एक अत्यंत ऋषितुल्य अशी महान विभूती, सालस, सात्त्विक, सोज्वळ, त्याग आणि समर्पणाचे मूर्तिमंत प्रतीक असलेले स्वामीजी आज स्वर्गवासी होऊन, अंर्तधान पावले आहे, ही आपल्या भारत देशाच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक क्षेत्राची फार मोठी हानी आहे व त्याच बरोबर आमच्या संस्थेचीही फार मोठ हानी झाली आहे. व अशी महान विभूती पुन्हा होणे नाही. असे डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले.


 



जनसंपर्क विभाग,
एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे, भारत