अपघात मुक्त भारत' संकल्पनेसाठी पुस्तिका, लघुपट आणि घोषवाक्ये

प्रेस नोट


'अपघात मुक्त भारत' संकल्पनेसाठी
पुस्तिका, लघुपट आणि घोषवाक्ये
......................
*पुण्यातील रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या सुरक्षा नियमांची  माहिती पुस्तिका, शॉर्ट फिल्म आणि घोषवाक्यांचे फलक*
............
वाहतूक शाखेचे उपायुक्त प्रसाद अक्कावणुरू यांच्या हस्ते   लोकार्पण


पुणे:



रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी , 'अपघात मुक्त भारत' ही संकल्पना घेवून,पुणे  पोलीस आयुक्त कार्यालय ( वाहतूक शाखा ) पुणे शहर  आणि ढेपेवाडा परिवाराच्या  संयुक्त विद्यमाने      वाहतुकीच्या सुरक्षा नियमांची  माहिती पुस्तिका, शॉर्ट फिल्म आणि घोषवाक्यांचे फलक   तयार करण्यात आले आहेत.



पुणे शहराचे
वाहतूक शाखेचे उपायुक्त प्रसाद अक्कावणुरू यांच्या हस्ते लोकार्पण कार्यक्रम आज 24 डिसेंबर रोजी
पार पडला.



श्री नितीन ढेपे  ह्यांनी रस्ता सुरक्षा अभियान  साठी विविध साधनांची निर्मिती केली असून त्यासाठी  त्यांनी वाहतुकीच्या सुरक्षा नियमांची माहिती पुस्तिका लिहिली आहे तसेच वाहतूक सुरक्षा घोषवाक्यांचे फलक आणि एक शॉर्टफिल्म तयार केली .
  नितीन ढेपे ह्यांनी वाहतूक नियमावली आणि घ्यायच्या काळजी बद्दल सर्वसामान्य माणसाला कळेल अशा सोप्या शब्दांत मराठी व इंग्रजी भाषेत माहिती पुस्तिका लिहिली आहे,
तसेच  सुरक्षित वाहतुकीसाठी २५ वेगवेगळी घोषवाक्ये (स्लोगन) लिहिली असून  त्याचे संदेश फलक तयार करण्यात आले आहेत. ते पोलीस समुपदेशन केंद्रात आणि रस्त्यांवर लावण्यात येणार आहेत.


बेशिस्त वाहनचालकावर ६ मिनिटांच्या शॉर्ट फिल्मचे लिखाण व निर्मिती देखील  नितीन ढेपे यांनी केली आहे.


 वाढत्या अपघातांपासून आपले व आपल्या आप्तांचे संरक्षण करणे आपल्याच हातात आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसांनीच पुढाकार घेऊन 'अपघात मुक्त भारत' घडवावा अशी हे सर्व करण्या मागची   संकल्पना आहे.


हा कार्यक्रम 24 रोजी दुपारी 3 वाजता कमिशनर ऑफिस , ट्रॅफिक ब्रँच,  येरवडा पुणे येथे पुणे शहराचे
वाहतूक शाखेचे उपायुक्त प्रसाद अक्कावणुरू यांच्या हस्ते
पार पडला. ह्यावेळी पोलीस निरीक्षक (नियोजन) चे  राजेश पुराणीक,पोलीस निरीक्षक  मशाळकर,
पोलीस निरीक्षक श्री.नलावडे ,पोलीस निरीक्षक श्री.खांडेकर
 पोलीस उपनिरीक्षक श्री. लोहोकरे ,हवालदार श्री. भोगन तसेच सौ. ऋचा ढेपे, श्री. अंकुश राजे, ज्योतिबा इंगळे, सुरज बांडागळे उपस्थित होते.


................................................
(Media co ordination : Prabodhan Madhyam- News Agency. *Deepak Bidkar* .9850583518)