रूग्ण हक्क परिषद काळाची गरज आहे - कलाभूषण रघुवीर खेडकर*

*रूग्ण हक्क परिषद काळाची गरज आहे - कलाभूषण रघुवीर खेडकर*


*पुणे -* रूग्ण हक्क परिषदेने सुरू केलेल्या वैशाली आरोग्य सुरक्षा योजनेने तमाशा कलावंताना नवसंजीवनी मिळाली आहे. पारंपरिक तमाशा कालावंताला त्याच्याठायी असलेली कला चिरंतन जिवंत ठेवते, मात्र सातत्याने होणारा प्रवास - दिवसरात्र तमाशाचे कार्यक्रम  यामुळे प्रकृतीच्या समस्या वारंवार निर्माण होतात. हृदयविकार, मधुमेह, लकवा, मेंदूच्या शस्त्रक्रिया अश्या रोगांची आजाराची नावे जरी ऐकली तरी जीव कासावीस होतो. गरीब कलावंतांना हॉस्पिटलमध्ये जगणं सोपं नाही आणि मरणंही सोपं राहिलं नाही, मात्र रूग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी त्याच्या वैशाली आरोग्य सुरक्षा योजनेत आमच्या फडातील दहा कलावंतांना मोफत सामावून घेतले आहे, यासाठी कोणतीही फी त्यांनी आकारली नाही, रूग्ण हक्क परिषदेची आज कलावंतांसह समाजाला खरी गरज आहे, अश्या भावना *महाराष्ट्र तमाशा परिषदेचे अध्यक्ष कलाभूषण रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केल्या.*
         
          यावेळी रूग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण, पुणे शहर कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते भीमाशंकर गायकवाड, महाराष्ट्र तमाशा परिषदेचे शफी शेख यांच्यासह तमाशा कलावंत उपस्थित होते.
        
          *यावेळी बोलताना रूग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले की,* तमाशा कलावंत श्रीमंत नाहीत, त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. शासनाची तुटपुंजी बावीसशे रुपये पेंशन. वय झाल्यावर कोणताही आधार नाही मात्र आजार अनेक आहेत. अश्या परिस्थितीत वादक, गायक, गीतकार, अभिनय करत तमाशा कलेशी एकरूप झालेल्या दहा कलावंताना आम्ही योजनेत सामावून घेतले आहे. या कलावंतांचा एक वर्षात होणारा सर्व खर्च योजनेच्या माध्यमातून केला जाईल असे ते म्हणाले.
       
         *यावेळी महाराष्ट्र तमाशा परिषदेचे शफी शेख म्हणाले की,* रघुवीर खेडकर तमाशा मंडळातील कलाकार असोत की इतर कोणत्याही फडातील तमाशा कलावंत असो कलाकार आजारी पडला की आम्ही रूग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांना सर्वात आधी फोन करतो. ते आरोग्याच्या प्रश्नावर आम्हाला आधारवड वाटतात. मात्र आता त्यांनीच आरोग्य सुरक्षा योजनेचे आम्हाला सभासद करून घेतल्याने आमची चिंता मिटली आहे.


Popular posts
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
कोरोना बाधित रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात सुविधा-अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले 
Image
शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता!*          *भावपूर्ण श्रद्धांजली* :- श्रीमंत कोकाटे
Image
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image