कै. नामदेव शंकर ढोरे यांचे गुरुवार दिनांक २६ डिसेंबर रोजी सायं. ०७.१५ वाजण्याच्या सुमारास वृध्दापकाळाने राहत्या घरी दु:खद निधन झाले

पिंपरी- दिनांक २७/१२/२०१९ विद्यमान महापौर सौ.उषा उर्फ माई मनोहर ढोरे यांचे दिर व श्री. मनोहर शंकर ढोरे यांचे जेष्ठ बंधू कै. नामदेव शंकर ढोरे यांचे गुरुवार दिनांक २६ डिसेंबर रोजी सायं. ०७.१५ वाजण्याच्या सुमारास वृध्दापकाळाने राहत्या घरी दु:खद निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात ३ मुले, ४ मुली, ४ जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर जुनी सांगवी येथील स्मशानभूमीत शुक्रवार दिनांक २७ डिसेंबर रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी अध्यात्मिक, सहकार, सामाजिक, राजकीय, कला व क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.