स्वच्छता अभियानात ‘बेरीज वजाबाकी’च्या बाल कलाकारांचा सहभाग

स्वच्छता अभियानात 'बेरीज वजाबाकी'च्या बाल कलाकारांचा सहभाग


 


प्रत्येक मुलाने आपल्या पालकांना दाखवावा आणि शिक्षकांनी आवर्जून बघावा असा 'बेरीज वजाबाकी' हा मराठी चित्रपट येत्या १३ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील बाल कलाकारांनी कात्रज येथील कै. कृष्णाजी बळवंतराव मोरे विद्यालयाला भेट देऊन स्वच्छता अभियानात सहभाग घेत स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.


'बेरीज वजाबाकी' ची टीम सध्या विविध शाळांमध्ये जाऊन प्रमोशन करत आहे. हे करत असताना एक सामाजिक जबाबदारी म्हणून या बाल कलाकारांनी पुणे महापालिकेचे सह आयुक्त श्री. ज्ञानेश्वर मोळक यांची भेट घेऊन स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. या उपक्रमामध्ये श्री. ज्ञानेश्वर मोळक आणि घन कचरा विभागाच्या टीमसह 'बेरीज वजाबाकी'च्या बाल कलाकारांनी कात्रज येथील कै. कृष्णाजी बळवंतराव मोरे विद्यालयाला एकत्रित भेट दिली. यावेळी चित्रपटाच्या टीमने 'बेरीज वजाबाकी' चित्रपटाची माहिती दिली, तसेच स्वच्छता अभियान आणि स्वच्छते बद्दलचे महत्व पटवून दिले. चित्रपटाचे दिग्दर्शक राजू भोसले आणि ज्ञानेश्वर मोळक यांनी स्वच्छता अभियान, नदी स्वच्छता अभियान आणि स्वच्छता मित्र याबद्दल मुलांना मार्गदर्शन केले. तसेच मुलांनी आयुष्यात पुढे जाताना कशाची बेरीज केली पाहिजे आणी काय सोडले म्हणजे काय वजा केले पाहिजे हे सांगितले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कुटे, शाळेतील शिक्षक, प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. केतकी धाडगे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लाम, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक नरेंद्र भालेराव, अपेक्स कमिटेचे ओम करे आदी उपस्थित होते.



Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image