महाराष्ट्रातील टोमॅटोच्या जाती.*

*महाराष्ट्रातील टोमॅटोच्या जाती.*


चेरी - ही तैवानहून येणारी जात आहे. ही जात साधारण जंगली प्रकारची असून फळांचा आकार गोलाकार टूटी-फ्रूटीसारखा असतो. पाण्याची कमतरता असल्यास रंग फिकट तांबूस, तर थंडीमध्ये लागवड केल्यास गर्द लाल असतो. पंचतारांकित हॉटेलांत चेरी फळाच्या ऐवजी ठेवण्याची प्रथा आहे.
धनश्री - टोमॅटो नारंगी रंगाचे, मध्यम आकाराचे व जास्त गराचे
नामधारी - फळ कडक, चौकोनी गोल (किंवा अंडाकृती गोल), गर्द लाल व वजनदार
भाग्यश्री - टोमॆटो मोठ्या आकाराचे, लांबट गोल लांबट व पूर्ण लाल रंगाचे
रूपाली - गर भरपूर असलेली  जात
लाल रंगाच्य़ा टोमॅटोचय़ा तुलनेत नारंगी रंगाचे टोमॅटोमधील लायकोपिन हे रंगद्रव्य शरीरात सहजपणे शोषले जाते. 


*टोमॅटोचे महत्त्व व प्रक्रिया.*


टोमॅटोचे आहारात विशेष औषधी महत्त्व नसले तरी त्याच्या सुधारित जातींचा लालभडक आकर्षक रंग, आकार व चव यांमुळे सर्व हॉटेलांत, शहरी वातावरणातील घरांमध्ये टोमॅटोचा तोंडी लावण्यासाठी व कोशिंबिरीममध्ये सर्रास वापर केला जातो. शहरातील हॉटेलमध्ये फ्रेंच फ्राय (बटाट्याचे तळलेले उभे तुकडे) वा बटाटा चिप्सबरोबर टोमॅटो केचप देण्याची रीत आहे. टोमॅटोमध्ये 'अ' (०.६४%) व 'क' (२.८२%) जीवनसत्त्व असते. 'लायकोपिन' या घटकामुळे टोमॅटोस लाल रंग येतो. टोमॅटोपासून पेस्ट (प्यूरी) व त्यापासून टोमॅटो सूप, केचप, ज्यूस, टोमॅटोपुरी लोणचे इत्यादी पदार्थ तयार करतात