नेरळ रेल्वे स्थानकात उडपी व्यक्ती रेल्वे प्रशासनाच्या आशीर्वादाने बाहेरील खाद्य पदार्थ यांची विक्री करीत असतात.
                मध्य रेल्वे च्या नेरळ या जंक्शन स्थानकातून माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी नॅरोगेज मार्ग सुरु होतो. पर्यटन स्थळ असल्याने नेरळ येथे लाखो पर्यटक लोकल गाडीने नेरळ येथे येत असतात. त्यामुळे नेरळ स्थानकात कायम स्वच्छता ठेवली जाते असताना नेरळ रेल्वे स्थानकात उडपी व्यक्ती रेल्वे प्रशासनाच्या आशीर्वादाने बाहेरील खाद्य पदार्थ यांची विक्री करीत असतात. दरम्यान,बाहेरील खाद्य पदार्थ हे रेल्वे स्थानकात विकण्यास परवानगी नाही अशी उद्घोषणा मध्य रेल्वे कडून सातत्याने केली जाते. मग नेरळ रेल्वे स्थानकातील सुरक्षा यंत्रणा त्या खाद्य पदार्थ विकणाऱ्या व्यावसायिक यांच्याकडे का लक्ष देत नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे. 

                      नेरळ या उपनगरीय रेल्वे स्थानकात माथेरान ला जाणारे पर्यटक उतरत असतात. उपनगरीय रेल्वे आणि एक्सप्रेस गाड्या यांनी नेरळ स्थानकात येत असतात.त्यात जंक्शन स्टेशन असलेल्या नेरळ स्थानकातून मिनीट्रेन सोडली जाते. त्यामुळे माथेरान साठी जगभरातून पर्यटक येत असतात आणि त्या पर्यटकांसाठी नेरळ रेल्वे स्थानकात प्रवाशांना देखील रेल्वे कडून सेवा देण्यात येत असतात.त्यात पर्यटक तसेच प्रवासी यांना सुविधा देण्यासाठी नेरळ स्थानकात दोन कँटीन आहेत. त्यात मध्य रेल्वे कडून बाहेरील पदार्थही विकण्यास बंदी असल्याची उद्घोषणा रेल्वे कडून केली जात असते. अशी उद्घोषणा सतत मध्य रेल्वे कडून करण्यात येत असते,असे असताना मात्र नेरळ रेल्वे स्थानकात सकाळी सात वाजण्याआधी दोन उडपी व्यावसायिक नेरळ रेल्वे स्थानकात येऊन व्यवसाय सुरु करतात.त्यांचा हा व्यवसाय नेरळ-माथेरान मिनीट्रेन ज्या ठिकाणी सोडली जाते त्या ठिकाणी गेली अनेक वर्षे व्यवसाय करीत असतात. मेंदू वडा इडली,सांबर आणि अन्य खाद्य पदार्थ तेथे ते दोन्ही उडपी कोणत्याही आडकाठी विना विकत असतात. 

             हा व्यवसाय ज्या ठिकाणी उडपी करीत असतात,तेथून जेमतेम ३० मीटर अंतरावर रेल्वे सुरक्षा दलाचे,नेरळ स्टेशन प्रबंधक आणि रेल्वे पोलीस यांची कार्यालये आहेत. तर अगदी ५ मीटर अंतरावर मिनी ट्रेन चे स्थानक प्रबंधक यांचे कार्यालय आहे असे असताना देखील मध्य रेल्वे ची महत्वाची यंत्रणा बाहेरील खाद्य पदार्थ यांची विक्री होत असताना माहित नसल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे तेथे सुरु असलेला व्यवसाय हा कोणाच्या आशीर्वादाने सुरु आहे ?याचा प्रश्न कायम असून नेरळ रेल्वे स्थानकात सर्व प्रकारचे बाहेरील पदार्थ विकण्यास परवानगी आहे काय? असा प्रश्न स्थानिक व्यापारी करीत आहेत. उडपी अंबरनाथ येथून येऊन व्यवसाय करीत असल्याने नेरळ स्टेशन समोर दुकाने टाकून बसलेल्या व्यावसायिक यांचा व्यवसाय देखील होत नाही. 

 

 

 

भगवान चव्हाण - स्थानिक जेष्ठ कार्यकर्ते 

नेरळ गावातील व्यवसायिक यांना स्थानकात प्रवेश देत नाही,पण बाहेरून आलेले उडपी दररोज व्यवसाय करीत आहेत. ते दोघे उडपी नेरळ गाव उठायच्या आत नेरळ ला पोहचतात आणि व्यवसाय सुरु करतात,त्यांना नेरळ स्टेशन आंदण दिले आहे काय? 

 

 

 

संदीप उतेकर- रेल्वे प्रवासी समस्या कार्यकर्ते 

बाहेरील खाद्य पदार्थ रेल्वे परिसरात विकत घेऊन खाऊ नये अशी केवळ उद्घोषणा ऐकायची का? नेरळ स्थानकात दररोज बाहेरचे उडपी हे अनधिकृत पणे व्यवसाय करीत असतात,मात्र त्यांना कोणताही कायदा नाही. जर अन्नातुन विषबाघा झाली तर त्यावेळी पोलीस कोणावर करावी करणार हे त्यांनी आधी सांगायला हवे. 

 

 

 

 

 

फोटो ओळ 

नेरळ स्थानकात बाहेरचे पदार्थ असे विकले जात आहेत 

छाय ः गणेश पवार