पुणे येथील रात्रशाळा विद्यार्थ्यांना स्वामी बॅग वाटप.

सर्वसामान्य तसेच ज्यांना नेहमीच्या शाळा कॉलेजात जाणे शक्य होत नाही आशांसाठी कार्य करणार्‍या पुना नाईट हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेह संमेलन व परितोषिक वितरण नुकतेच संपन्न झाले.सरस्वती मंदिराच्या झांजले सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष डॉ.अनिल कुलकर्णी,प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थी राहुल जगताप.डॉ. मिताली जगताप,ज्येष्ठ साहित्यिक बबन पोतदार,सुधीर चौधरी,अनिल शिदोरे,प्राचार्य अविनाश ताकवले,उमेश सरगर,दिलीप लंके आदी मान्यवर उपस्थित होते.यवली उपस्थित १०० विद्यार्थ्यांना स्वामी बॅग श्री राहुल जगताप यांचे वतीने प्रदान करण्यात आल्या.या प्रसंगी बोलताना राहुल जगताप यांनी प्रतिकूल परिस्थितित ही शिक्षण पूर्ण करणार्‍या विद्यार्थांचे कौतुक वाटते असे संगितले.  


छायाचित्र :बॅग वाटप करतांना राहुल जगताप,मिताली जगताप व मान्यवर