चिखलवाडी येथील जुन्या ड़े्नेज लाईन वारंवार तुंबुन ,सांडपाणी घरात घुसते.....मा.फिरोज मुल्ला

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


पुणे प्रवाह न्युज पोर्टल


चिखलवाडी येथील जुन्या ड़े्नेज लाईन वारंवार तुंबुन ,सांडपाणी घरात घुसते.....मा.फिरोज मुल्ला

पुणे.. प्रभाग क्र ८मधील      चिखलवाडी येथील परिसरातील  जुन्या ड़े्नेज लाईन वारंवार तुंबत असतात त्याचे सांडपाणी पावसाळा नसतानाही सध्याच्या परिस्थितीत घरात पाणी घुसत आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका आहे पावसाळ्यात यापेक्षा भयंकर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे याकरिता मनपाचे आयुक्त, व क्षेत्रीय आयुक्त , तसेच साह्यक आयुक्त यांना २/१२/२०१९, ११/५/२०२०, २३/११/२०२०,या तारखेस सतत अर्ज करून फोटो काढून निदर्शनास आणून दिले आहे कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई केली नाही म्हणून अशा गंभीर समस्या सोडवण्यासाठी जुन्या ड़े्नेज लाईन बदलून त्वरित नवीन ड़े्नेज लाईन टाकण्यासाठी औंध क्षेत्रीय कार्यालय येथे धरणे आंदोलन जनशक्ती विकास संघटनेच्या वतीने फिरोज मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले ह्या समस्या त्वरित नाही सोडविल्या तर पुढील आंदोलन तिव्र छेडण्यात येईल असे फिरोज मुल्ला यांनी साह्यक आयुक्त यांना सांगितले यावेळी संदिप शेंडगे, नाना भालेराव, सुफीयान खान, प्रकाश म्हस्के,सुशांत गायकवाड, विजय जगताप, रमेश खरात,आली शेख, आदी कार्यकर्ते उपस्थित होते