*माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस ना.डॉ.गोऱ्हे यांनी केले पुष्पहार अर्पण...*

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


* *माँसाहेबांच्या जयंतीनिमित्त ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून ससून हॉस्पिटलमधील महिलांना पुणे शिवसेनेच्या वतीने ब्लँकेटचे वाटप...* पुणे दि.०६ : ममता दिन तसेच तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या, माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या ९० व्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र विधानपरिषदेचा उपसभापती व शिवसेना प्रवक्ता ना.डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी माजी जिल्हा संघटीका सौ. स्वाती ढमाले, स्री आधार केंद्र अश्विनी शिंदे, प.सं. सदस्य हवेली सौ. सुर्वणा करजांवणे,शिवसेना कोथरुड वि.स. समन्वयक सविता बलकवडे, कस्तुरी पाटील,महिला उद्योजिका सुप्रिया बडवे,शिवसेना प्रणित स्थानिय लोकाधिकार समितीचे पदाधिकारी व पर्यावरणस्नेही ऊद्योजक श्री.शिरीष फडतरे, शिवसेना उपशहरप्रमुख श्री. आनंद गोयल, अभि ग्रुप उद्योजक डॅा. जितेंद्र जोशी, किरकटवाडी ग्रा.पं. सरपंच श्री. गोकुळ करंजावणे, श्री. राजू विटकर, प्रवीण सोनवणे आदी व्यक्तींनी उपस्थित असून अभिवादन केले. माँसाहेबांच्या जयंतीनिमित्ताने ना.डॉ.गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून उपशहरप्रमुख श्री गोयल यांनी पुणे जिल्ह्यातील ससून हॉस्पिटलमध्ये प्रसूती झालेल्या महिलांना सध्या थंडीचा काळ असल्याने ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. ससून हॉस्पिटलमध्ये येणारे कुटुंब हे गरीब असतात त्यांना या काळात थंडी असल्याने घरी गेल्यावर खूप ब्लँकेट नवजात बालके व मातांना गरजेची असल्याने डॉ.गोऱ्हे यांच्या संकल्पनेबद्दल आणि सहकार्यबद्दल ससून हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ.तावरे आभार व्यक्त केले आहेत.