पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे :- अंत्यसंस्कार करतानाच काळाने डाव साधला ;
स्मशानभूमीचं छत कोसळून १७ जणांचा मृत्यू........
उत्तर प्रदेशमधील गाजियाबाद जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे.
येथील मुरादनगर स्मशानभूमी परिसरातील एका ठिकाणचे छत कोसळल्याने त्या खाली दबून १७ जणांचा मृत्यू झाला आहे.
तर, अनेकजण ढिगाऱ्याखाली दबल्या गेले असून, बचावकार्य सुरू आहे.
आतापर्यंत ३८ जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.
या दुर्घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तर, या दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असं विभागीय आयुक्त अनिता मेश्राम यांनी सांगितलं आहे.
अत्यसंस्कारसाठी आलेले लोकं पाऊस आल्याने एका छताखाली उभा राहिले होते.
तेवढ्यात त्यांच्या अंगावर छत कोसळलं व ते सर्वजण त्याखाली दबल्या गेले.
घटनेची माहिती मिळाताच पोलीस व एन.डी.आर.एफ. टीम घटनास्थळी दाखल झाली व बचावकार्य सुरू झालं.
या दुर्घटनेबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केलं आहे.
“मी जिल्हा अधिकार्यांना मदतकार्य राबवण्याच्या व घटनेचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
घटनेतील पीडित व्यक्तींना सर्वतोपरी मदत केली जाईल” असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे.